शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

धरणात अडकलेल्या बिट्याला जीवदान

By admin | Updated: August 19, 2016 23:00 IST

वडज धरण परिसरातील इनामवाडीवस्तीवर आजारी अवस्थेत वावरत असलेली बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले

जुन्नर तालुक्यातील इनामवाडी परिसरात वडज धरणाच्या पाण्यातून बिबट्याच्या मादीला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिले जीवदानआजारी बिबट्याची मादी पळताना धरणाच्या पाण्यात गेली होती जुन्नर : वडज धरण परिसरातील इनामवाडीवस्तीवर आजारी अवस्थेत वावरत असलेली बिबट्याच्या मादीला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्र व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले. याबाबत घडलेली घटना अशी, इनामवाडीवस्तीवर गुरुवारी संध्याकाळी बिबट्याचा वावर ग्रामस्थांच्या निदर्शनास आला होता. शुक्रवारी सकाळी ७ वाजता पुन्हा बिबट्या निदर्शनास आला. त्यानंतर वनविभागास याची माहिती मिळाल्यावर माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे अजय देशमुख, सहकारी महेंद्र ढोरे, वनविभागाचे कर्मचारी इनामवाडीवस्तीवर पोहोचले. लोकांची गर्दी झाल्याने बिबट्या धरणाच्या पाण्यात जाऊन पोहत असे व पुन्हा पाण्याच्या बाहेर येऊन बसत. बाहेर आलेल्या या बिबट्याला वनविभागाचे कर्मचारी रमेश खरमाळे यांनी गुंगी आणणारे इंजेक्शन (डार्ट) मारले, परंतु ते हुकले.

यानंतर डॉ. अजय देशमुख यांनी ब्लो पाइपणे (डार्ट) मारले, परंतु तो बिबट्याच्या हाडावर बसून उडाला. त्यामुळे बिबट्या गडबडून गेला. एकंदर हालचालीवरून बिबट्या आजारी व जखमी असल्याने आक्रमक नसल्याचे डॉ. अजय देशमुख यांच्या लक्षात आले. त्यामुळे वनविभागाचे कर्मचारी शिवाजी मोघे यांनी बिबट्याला जंगली प्राण्यांची दोरी गळ्यात अडकवून पकडण्याच्या साधनाने पकडण्याची सूचना केली. त्याप्रमाणे ( स्नेर) गळ्यात अडकवून बिबट्याला पकडण्यात आले. परंतु (स्नेर) तोडून बिबट्या वडज धरणाच्या पाण्याकडे धावला. बिबट्या धरणाच्या पाण्यात पोहत असतानाच थोडासा डार्ट लागल्याने बिबट्याला गुंगी येऊन पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला होता.

तोपर्यंत बिबट्या पाण्यात बुडू लागल्याने अनिल भालेराव, बबन भालेराव या युवकांनी पोहत जाऊन धाडसाने बिबट्याच्या शेपटीला पकडून त्याला धरणाच्या पाण्याबाहेर काढले. नंतर बिबट्याला जाळीत जेरबंद करून पुन्हा (डार्ट) मारून त्याच्या पोटातील पाणी बाहेर काढून बिबट्याला वाचविले. या मादीला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहेत. वनविभागाचे कर्मचारी कृष्णा दिघे, मडके, वैभव नेहरकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.