हायकोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 08:27 IST2025-06-12T08:27:24+5:302025-06-12T08:27:34+5:30

Mumbai High Court: उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था केली जात असल्याचे मुख्य न्या. आलोक आराधे यांनी मंगळवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितले. 

Live broadcast of High Court proceedings | हायकोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

हायकोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण

मुंबई - उच्च न्यायालयाच्या कामकाजाच्या थेट प्रक्षेपणासाठी आवश्यक ती तांत्रिक व्यवस्था केली जात असल्याचे मुख्य न्या. आलोक आराधे यांनी मंगळवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्याचा उल्लेख ॲड. मॅथ्यूज नेदुम्पारा यांनी केल्यानंतर मुख्य न्या. आलोक आराधे यांनी कामकाजाच्या थेट प्रक्षेपणाबद्दल माहिती दिली. 

तांत्रिक व्यवस्था करण्याचे काम सुरू 
काही न्यायालयांचे कामकाज थेट प्रक्षेपित करण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आले आहे. तांत्रिक व्यवस्था करत आहोत. पहिल्या पाच न्यायालयांचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल,असे मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने म्हटले. 

पहिली पाच न्यायालये 
मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांचे खंडपीठ
न्या. रेवती मोहिते-डेरे व न्या. नीला गोखले यांचे खंडपीठ
न्या. एम. एस. सोनक व न्या. जितेंद्र जैन यांचे खंडपीठ
न्या. रवींद्र घुगे व न्या. मिलिंद साठ्ये यांचे खंडपीठ
न्या. अजय गडकरी व न्या. राजेश पाटील यांचे खंडपीठ

Web Title: Live broadcast of High Court proceedings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.