शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

‘राजा काय करतो' या भानगडीत साहित्यिकांनी पडू नये- पुनम महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 9:41 PM

साहित्यिक आणि कलाकारांनी उत्तम साहित्य, कला निर्माण करावी.

पुणे: बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय व्यासपीठावरून ‘राजा तू चुकत आहेस, सुधारलं पाहिजे’, अशी भूमिका मांडणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुख यांना शनिवारी भाजपा खासदार पुनम महाजन यांनी टोला लगावला. त्या शनिवारी सारसबागेत आयोजित करण्यात आलेल्या युवा संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी पुनम महाजन यांनी म्हटले की, साहित्यिक आणि कलाकारांनी उत्तम साहित्य, कला निर्माण करावी. उगाच 'राजा काय करतोय' या भानगडीत पडू नये. यावेळी लातूर येथील एका तरुण कवीने नवीन कलाकार, साहित्यिकांसाठी सरकारच्या काय योजना आहेत, असा प्रश्न महाजन यांना विचारला. वर, सर्वात आधी कलाकार साहित्यिकांनी मतदानाचा हक्क बजावावा. तसेच 'राजा काय करतोय, प्रजा काय करते', हे विचारु नये असे सांगत संमेलनाध्यक्ष देशमुख आणि अभिनेते प्रकाश राज यांच्यावर निशाणा साधला.काही दिवसांपूर्वी बडोदा येथे पार पडलेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष देशमुख यांनी अध्यक्षीय भाषणात 'राजा तू चुकतोयस, सुधारलं पाहिजे’ असे सांगत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला होता. त्यालाच महाजन यांनी प्रत्युत्तर देत कला आणि साहित्यात खूप काही करण्यासारखे आहे, असे सांगत  पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या पुनम महाजन यांनी राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीसंदर्भातही भाष्य केले. इंजिनदेखील घडयाळ्याच्या ठोक्यावर चालते हे पुण्यातील मुलाखतीवरून दिसून आले, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली. 

उगाच दुस-यांच्या पक्षात डोकावू नये            विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी अनेक प्रयत्न  करत आहेत. त्यातच शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद नसल्याचे वक्तव्य करून वादाला तोंड फोडले होते. यावर महाजन यांनी पवार यांनाच स्वत:च्या पक्षातील नेत्यांमध्ये संवाद आहे का ? आधी त्याकडे लक्ष द्यावे, उगाच दुस-याच्या पक्षात डोकावू नये, असा सल्लाही दिला. 

टॅग्स :Poonam Mahajanपूनम महाजनLaxmikant Deshmukhलक्ष्मीकांत देशमुखPuneपुणेBJPभाजपा