२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:57 IST2025-12-10T13:54:29+5:302025-12-10T13:57:26+5:30
Holiday List 2026 Maharashtra: महाराष्ट्र सरकारने २०२६ या वर्षासाठी राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. भाऊबीजेला अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात आले आहे.

२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
Public Holiday List 2026 Maharashtra: काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या २०२६ या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या महाराष्ट्र सरकारकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून यावेळी भाऊबीजेच्या दिवशीही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या वर्षात २४ सुट्ट्या असणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागाकडून सार्वजनिक सुट्ट्यांची अधिसूचना काढण्यात आली आहे. २०२६ या वर्षातील पहिली सार्वजनिक सुट्टी २६ जानेवारी रोजी आहे. तर शेवटची सुट्टी २५ डिसेंबर रोजी असणार आहे. यात एक सुट्टी अतिरिक्त मिळणार आहे.
राज्य सरकारकडून बँकांना आपले वार्षिक रोखे पूर्ण करण्यासाठी १ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी फक्त बँकांसाठीच असणार आहे.
महाराष्ट्रात २०२६ वर्षांमध्ये असणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची यादी
प्रजासत्ताक दिन - २६ जानेवारी २०२६, सोमवार
महाशिवरात्री - १५ फेब्रुवारी २०२६, रविवार
छत्रपती शिवाजी महाराज जयंती - १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार
होळी (दुसरा दिवस) - ३ मार्च २०२६, मंगळवार
गुढीपाडवा - १९ मार्च २०२६, गुरुवार
रमझान ईद - २१ मार्च २०२६, शनिवार
रामनवमी - २६ मार्च २०२६, गुरुवार
महावीर जयंती - ३१ मार्च २०२६, मंगळवार
गुड फ्रायडे - ३ एप्रिल २०२६, शुक्रवार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती - १४ एप्रिल २०२६, मंगळवार
महाराष्ट्र दिन - १ मे २०२६, शुक्रवार
बुद्ध पौर्णिमा - १ मे २०२६, शुक्रवार
बकरी ईद - २८ मे २०२६, गुरुवार
मोहरम - २६ जून २०२६, शुक्रवार
स्वातंत्र्य दिन - १५ ऑगस्ट २०२६, शनिवार
पारशी नववर्ष दिन - १५ ऑगस्ट २०२६, शनिवार
ईद ए मिलाद - २६ ऑगस्ट २०२६,बुधवार
गणेश चतुर्थी १४ सप्टेंबर २०२६, सोमवार
महात्मा गांधी जयंती -२ ऑक्टोबर, शुक्रवार
दसरा - २० ऑक्टोबर २०२६,मंगळवार
दिवाळी (लक्ष्मीपूजन) - ८ नोव्हेंबर २०२६, रविवार
दिवाळी (बलिप्रतिपदा) - १० नोव्हेंबर २०२६, मंगळवार
गुरुनानक जयंती २४ नोव्हेंबर २०२६, मंगळवार
ख्रिसमस - २५ डिसेंबर २०२६, शुक्रवार
भाऊबीजेची अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी
राज्य सरकारने भाऊबीजेला म्हणजे ११ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त सुट्टी राज्य सरकारची शासकीय कार्यालये, राज्य शासनाचे उपक्रम, महापालिका, नगर परिषद, नगर पंचायत जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्यासाठी जाहीर करण्यात आलेली आहे.