१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 07:24 IST2025-12-17T07:23:24+5:302025-12-17T07:24:00+5:30
आम्ही जसे तुमच्या कामांचे श्रेय घेत नाही तसेच तुम्हीही आमच्या कामांचे श्रेय घेऊ नका, अशी टीका उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केली.

१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
मुंबई : भाजप सरकारच्या नोटाबंदी, भारतीय रुपयाची घसरण व विविध फेक योजनांचे श्रेय आम्ही घेतले नाही, घेणारही नाही. मात्र, आमचा पक्ष व चिन्ह चोरणारा व व्होटचोरी करणारा भाजप असे दोघे मिळून महापालिकेतील सत्तेच्या माध्यमातून आम्ही केलेल्या विकासकामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करताहेत. या क्रेडिट चोरांपासून मुंबईला वाचविण्याची गरज आहे. आम्ही जसे तुमच्या कामांचे श्रेय घेत नाही तसेच तुम्हीही आमच्या कामांचे श्रेय घेऊ नका, अशी टीका उद्धवसेनेचे नेते आ. आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी केली.
वरळी येथे आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आदित्य यांनी १९९७ पासून मुंबई पालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकासकामांचे सादरीकरण केले. १९९७ मध्ये पालिकेची ६५० कोटींची तूट योग्य आर्थिक नियोजनामुळे कोणतेही काम न थांबवता, कर न वाढविता, पैसे न लुटता पारदर्शक कारभार करून वाढवली. पालिकेच्या तिजोरीत २२ हजार कोटींची भर घातली. मात्र, २०२२ मध्ये सरकार पाडून सत्तेत आलेल्यांनी संपूर्ण तिजोरी साफ केली आहे, असे म्हणाले.
महापालिकेच्या शाळांमधील डिजिटल शिक्षण दिले.. आरोग्यसेवेच्या माध्यमातून नर्सिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज, ट्रामा केअर सेंटर उभे केले. बेस्ट बसमध्ये सुधारणा केली. पाणी पुरवठ्यासाठी स्वतःची धरणे बांधली, अशा विकासकामाच्या माध्यमातून मुंबईकरांना सुविधा दिल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सुरू झालेले कोस्टल रोडचे काम, अशी कामे घरोघरी नेण्याचे आवाहन त्यांनी केले.