शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना...
2
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
3
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
4
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
5
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
6
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
7
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
8
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
9
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
10
Vastu Shastra: प्रगतीचे मार्ग मोकळे करायचे आहेत? मग तुमच्या घरातील 'हे' वास्तू दोष त्वरित दूर करा!
11
पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार?
12
"माझ्यावर हसतोय?" कुर्ल्यात तरुणावर चाकूनं सपासप वार, भररस्त्यात घडलेल्या घटनेनं खळबळ!
13
पुतिन-ट्रम्प यांची फोनवर चर्चा; युरेनियम रशियाला देण्याची ऑफर अमेरिकेने नाकारली! इराणचं टेन्शन वाढलं
14
अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ प्राचीन मूर्ती, अमूल्य ठेव्याची एवढी आहे किंमत 
15
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
16
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
17
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
18
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
19
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
20
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवा; राज्य सरकारचा सुप्रीम कोर्टात अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 06:53 IST

घटनापीठासमोर सुनावणी होणार : राज्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरूच

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : मराठा आरक्षणावरील स्थगितीचा अंतरिम आदेश उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारने सोमवारी विनंती अर्ज दाखल केला आहे. मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्यासाठी राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आरक्षण समर्थकांमध्ये नाराजी होती.

आता मराठा आरक्षणावर घटनापीठासमोर सुनावणी होईल. तत्पूर्वी सरन्यायाधीशांना घटनापीठ स्थापण्याची विनंती करावी लागेल. घटनापीठ अस्तित्वात आल्यानंतरच सुनावणीस सुरुवात होईल. अद्याप त्यासाठी दिवस ठरलेला नाही.प्रयत्न सोडणार नाही : मुख्यमंत्रीमराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्याच्या मागणीसाठी तीव्र पडसाद उमटत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी सोमवारी बैठक झाली. मराठा समाजाचे आरक्षण कायम राहील यासाठी प्रयत्नांची कुठलीही कसर सोडली जाणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.अशोक चव्हाण म्हणाले की, मराठा आरक्षणावरील स्थगिती निरस्त करण्यासाठी अर्ज दाखल करणे ही प्रक्रिया आहे. यावर सुनावणी होईल. मोठे घटनापीठ लवकरात लवकर स्थापन व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. चव्हाण यांनी शरद पवार यांच्याशी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये यासंदर्भात चर्चा केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही बैठकीला उपस्थित होते.आता पुढे काय?राज्य सरकारने अर्ज दाखल केल्याने तूर्त अध्यादेश काढण्यात येणार नाही. मात्र अध्यादेशाच्या पर्यायाची चाचपणीदेखील सुरू आहे. त्यानंतर पुनर्विचार याचिकादेखील राज्य सरकार दाखल करू शकते.सध्या तरी घटनापीठाकडे दाद मागण्याचा पर्याय सरकारने निवडला आहे. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातदेखील आरक्षण दिले असल्याने दोन्ही राज्यांना वेगवेगळा न्याय लावता येणार नसल्याची भूमिका राज्य सरकार मांडणार आहे.मराठा आरक्षणाला जी अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे ती उठवली जावी, ही आमची विनंती आम्ही वरिष्ठ खंडपीठापुढे मांडली आहे. यावर सुनावणी होऊन पुढील दिशा मिळेल. हा अर्ज करून आम्ही कोंडी फोडण्याच्या दृष्टीने एक टप्पा पुढे गेलो आहोत. सरकारच्या वतीने यावर लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडतील.- अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री, तथा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय