शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

परत सांगतो सोडून जाईन! सोडू-सोडू म्हणत भाजपल्या बिलगलेल्या 'उद्धवदादू'ला 'राजा'चा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 19:59 IST

२०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे.

मुंबई - २०१९ साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत स्वबळावर उतरण्याची भाषा करणाऱ्या पण प्रत्यक्षात केंद्र आणि राज्यातील सत्ता न सोडणाऱ्या शिवसेनेवर राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून जळजळीत टीका केली आहे. राज ठाकरे यांनी बुधवारी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रामधून  शिवसेनेच्या सत्ता सोडण्याच्या धमक्यांचा समाचार घेतला आहे.   युतीमध्ये बेबनाव आल्याने शिवसेनेकडून युती तोडून सत्ता सोडण्याच्या धमक्या सातत्याने देण्यात येत आहेत. त्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केले आहे. " महाराष्ट्र सरकार (मधील एक) सादर करत आहे. (किती अंकी  महित नाही.  "परत सांगतो सोडून जाईन!" अशा आशयाचे शीर्षक राज यांनी या व्यंगचित्राला दिले आहे.  

त्याआधी काल राज ठाकरे यांनी व्यंगचित्रामधून गुजरात निवडणुकीत झालेल्या दमछाकीवरून नरेंद्र मोदी  आणि अमित शहा यांना चिमटा काढला होता. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालावर व्यंगचित्रातून अत्यंत मार्मिक भाष्य  राज यांनी या व्यंगचित्रामधून केले होते. गुजरातमध्ये पुन्हा भाजपाने सत्ता मिळवली असली तरी या निवडणुकीने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची राजकीय प्रतिमा उंचावली हे वास्तव आहे. भाजपाने सरकार स्थापन केले यापेक्षा काँग्रेसची गुजरातमधील कामगिरी सुधारली. राहुल गांधींनी आपले राजकीय चातुर्य दाखवून दिले. राज यांनी तोच धागा पकडत गुजरातमध्ये मोदी-शहांपेक्षा राहुल सरस ठरल्याचे आपले व्यंगचित्रातून दाखवून दिले. या निवडणुकीने राहुल यांची सोशल मीडियावरील पप्पू ही प्रतिमा बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली. एरवी राज ठाकरे आपल्या भाषणांमधून राहुल गांधींची खिल्ली उडवतात पण यावेळी आपल्या व्यंगचित्रातून त्यांनी राहुल यांचे कौतुक केले. गुजरात निवडणुकीने मोदी-शहांना छोटे केले तर राहुल यांची राजकीय उंची वाढवल्याचा निष्कर्ष राज यांनी काढला आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा