शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

विधान परिषदेचे ‘अर्थ’कारण; बहीण-भावाचे राजकारण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2018 19:21 IST

अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे.

लातूर : स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीचे ‘मूल्य’ दिवसेंदिवस वाढत असून, इथे अर्थकारणाच्या सावलीला राजकारण खेळले जात आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर विधान परिषद निवडणूक मैदानही सध्या एकमेकांवरील कूरघोड्यांनी गाजत आहे. ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने घेतलेली माघार अनेक अर्थाने प्रश्न उभे करणारी आहे. 

मंत्री पंकजा मुंडे यांचे मानलेले भाऊ आणि लातूर भाजपाचे नेते रमेश कराड यांना पक्षात आपली बाजू मांडणाऱ्या बहिणीशिवाय दुसरे कोणी नाही, असे वाटले. अन् त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला.  त्यावर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी हा पंकजातार्इंना धक्का असल्याचे सांगितले. त्याला उत्तर देताना पंकजातार्इंनी सुरेश धस यांच्यामुळे राष्ट्रवादीलाच धक्का असल्याचे म्हटले. दरम्यान, अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी घडलेले राजकीय नाट्य सर्वांनाच धक्का देणारे ठरले. त्यातही बहिणीकडून भावाला मोठा धक्का असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले. 

कराड यांना राष्ट्रवादीने पक्षात घेऊन बी फॉर्म दिला व उमेदवारी अर्ज भरला होता. दरम्यान, शेवटच्या क्षणी कराड यांनी घेतलेली माघार भाजपाला साह्यभूत ठरणारी आहे, असा एक तर्क लढविला जात आहे. प्रत्यक्षात भाजपाने उमेदवारी न दिल्याने त्या पक्षाचा वनवास संपवून स्वगृही आलो म्हणजेच राष्ट्रवादीत आलो म्हणणारे रमेश कराड केवळ भाजपाचा मार्ग सुलभ व्हावा, या एकमेव कारणासाठी आपला राष्ट्रवादीकडून भरलेला अधिकृत उमेदवारी अर्ज मागे घेणार नाहीत. 

राष्ट्रवादीने पक्षप्रवेश देताना उमेदवारीचे आश्वासन पाळले. त्यात राजकीय ‘मूल्य’ कुठे ढासळले, हे एकमेकांची तोंडे उघडल्यावरच कळणार आहे. बहीण-भावाची राजकीय कूरघोडी, मानलेल्या भावाचा धक्कादायक निर्णय या भोवती चर्चा होत असली तरी पडद्यामागे आणखी बरेच काही घडले आहे. त्याचा राजकीय धुरळा दीर्घकाळ उडत राहील.

दुरंगी लढतीकडे लक्ष...भाजपा उमेदवार सुरेश धस विरुद्ध अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे अशी लढत होईल. राष्ट्रवादीने जगदाळे यांना पाठिंबा दिला. काँग्रेस सकारात्मक निर्णयाच्या वाटेवर आहे. आघाडीचा धर्म अपक्षाच्या पाठीशी राहिला तर भाजपाला याही स्थितीत तूल्यबळ टक्कर द्यावी लागेल. १००६ मतदारांच्या गाठीभेटी, पक्षांतर्गत कूरघोड्या कशा हाताळल्या जातील, यावर उमेदवारांच्या पदरी मतांचे मूल्य पडेल. एकंदर, उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यांतील राजकीय गुंता वाढविणारी ही निवडणूक ठरली असून, कोण कोणाच्या पाठीशी आहे, स्वपक्षातही कोणाचे उट्टे काढले गेले, हे निकालानंतर कळेल.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस