शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

विधिमंडळ अधिवेशन: मराठवाड्याच्या पाण्याचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 02:31 IST

हक्काच्या पाण्यावर चर्चा तरी होणार की नाही?

- स. सो. खंडाळकर औरंगाबाद : मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला; पण सरकारकडून काही ठोस उपाययोजना दिसल्या नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात आले की, कोकणाचे पाणी मराठवाड्याला देऊ, कधीच दुष्काळ पडू देणार नाही, अशा वल्गना करतात; पण पाठ फिरली की ते सारे विसरून जातात. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याचे तरी बोला, त्यावर तरी विधिमंडळात चर्चा घडवून आणा, अशी किमान अपेक्षासुद्धा पूर्ण होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी पावसाळा आला की, अहमदनगर व नाशिकची मंडळी कधी मराठवाड्याच्या अंगावर धावून येतील, याचा नेम नाही. हक्काच्या पाण्यासाठी सतत संघर्ष सुरूआहे; पण न्याय मिळत नाही. हे व्हायला पाहिजे कृष्णेचे हक्काचे पाणी मिळाल्यास उस्मानाबाद, बीड व काहीअंशी लातूरचा प्रश्न सुटू शकतो. वैनगंगा, इंद्रावती व प्राणहिता या नद्यांचे ३० ते ४० टीएमसी पाणी मिळाल्यास नांदेड, परभणी जिल्ह्यांना फायदा होऊ शकतो. हे पाणी येलदरी व उर्ध्व पैनगंगामध्ये टाकता येऊ शकते. वैतरणा, दमण गंगा व पिंजाळ या नद्यांचे पाणी उचलता आल्यास औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्याला लाभ मिळू शकेल. सध्या नीरेचा वाद जोरात सुरूआहे. हे पाणी मराठवाड्याला मिळू शकेल की नाही, अशी सध्याची परिस्थिती आहे.मी प्रेझेंटेशन द्यायला तयार - नागरे२० जून रोजी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुंबईत बैठक होणार आहे; पण अद्याप मला निरोप नाही. आल्यास मी नक्की जाणार आहे व तेथे प्रेझेंटेशनही द्यायला तयार आहे. ग्रामीण विकासमंत्री पंकजा मुंडे यांनीही पाण्यासंबंधी त्यांची नोट सरकारला दिली आहे. त्यावरही चर्चा व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यातील आमदारांबरोबर एकत्रित चर्चा करण्याची गरज आहे, असे जलतज्ज्ञ शंकरराव नागरे यांनी सांगितले.विधानसभेत चर्चा होणार - बंबगंगापूरचे आमदार व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर नेहमीच आग्रही भूमिका घेणारे प्रशांत बंब म्हणाले, यावेळी विधानसभेतच चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहोत. नुकतीच लातूरला विकास परिषद झाली. त्याला मी उपस्थित होतो. मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळायलाच पाहिजे.जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे व अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यापूर्वीच कोकणचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेवर टीका केली होती. ही गोष्ट अव्यवहार्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMarathwadaमराठवाडा