धनंजय मुंडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
By Admin | Updated: December 23, 2014 00:41 IST2014-12-23T00:41:23+5:302014-12-23T00:41:23+5:30
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची निवड सोमवारी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी जाहीर केली.

धनंजय मुंडे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते
नागपूर: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांची निवड सोमवारी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी जाहीर केली.
सभागृहातील सदस्य संख्येनुसार राष्ट्रवादीचे बहुमत असल्याने आपण ही निवड घोषित करीत असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मंगळवारी घोषित होण्याची शक्यता आहे. तब्बल दोन आठवड्यांच्या कालावधीनंतर किमान एका सभागृहाला विरोधी पक्षनेता लाभला.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय जाहीर व्हावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून सातत्याने सभागृहात करण्यात येत होती. या पदावर काँग्रेसनेही दावा केला होता. याकरिता किमान तीन-चारवेळा कामकाज तहकूब झाले. सोमवारीही सुनील तटकरे यांनी निर्णय जाहीर करण्याची मागणी केली होती.