शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

नेतेमंडळी नुकसानीच्या पाहणी दौऱ्यावर! थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:55 AM

सकाळी बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची ते पाहणी करतील. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करतील. (Sharad pawar, uddhav thackeray, devendra fadnavis)

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून मराठवाड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.

मुंबई : गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून मराठवाड्यात दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, या दौऱ्यावर शरद पवार थेट बांधावर जावून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

सकाळी बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची ते पाहणी करतील. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करतील. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ आॅक्टोबर रोजी पुन्हातुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.मुख्यमंत्री उद्या सोलापुरात -राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसला असून पूरपरिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थ यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोमवारी रोजी सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. मुख्यमंत्री सोमवारी सकाळी विमानाने सोलापूरला पोचतील. तेथून सकाळी साडेनऊला मोटारने सांगवी खुर्दकडे (ता. अक्कलकोट) प्रयाण तेथील नुकसानीची पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करतील. सकाळी ११ वाजता सांगवी पुलाकडे प्रयाण व बोरी नदीची व पूरग्रस्त भागाची पाहणी. ११.३० वाजता अक्कलकोट येथे आगमन व हत्ती तलावाची पाहणी करून तेथून रामपूरकडे प्रयाण तेथील पाहणी आटोपून दुपारी १२.१५ वाजता बोरी उमरगेकडे प्रयाण. तेथील पाहणी व ग्रामस्थांशी चर्चा करून दुपारी तीननंतर अधिकाºयांशी चर्चा करुन ते मुंबईकडे प्रयाण करतील.देवेंद्र फडणवीस करणार पुण्यातून सुरुवातविधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सोमवारपासून तीन दिवस राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. बारामतीपासून ते दौरा प्रारंभ करतील. कुरकुंभ, इंदापूर, टेंभूर्णी, करमाळा, परांडामार्गे ते उस्मानाबादकडे रवाना होतील. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांच्या प्रवासानंतर २० आॅक्टोबर रोजी उस्मानाबाद, लातूर, बीड आणि परभणी या जिल्ह्यातील ठिकाणांना ते भेटी देणार आहेत. २१ आॅक्टोबर रोजी हिंगोली, जालना, औरंगाबादचा ते दौरा करतील. या तीन दिवसांत ९ जिल्ह्यांमध्ये सुमारे ८५० कि.मी.चा प्रवास ते करणार आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारMaharashtraमहाराष्ट्र