शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता दिल्यास एलबीटी रद्द

By admin | Updated: July 23, 2014 00:19 IST

आगामी विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास नोव्हेंबरअखेर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात येईल. त्याऐवजी पर्यायी कर दिला जाणार नाही.

पुणो : आगामी विधानसभा निवडणुकीत संधी दिल्यास नोव्हेंबरअखेर स्थानिक संस्था कर (एलबीटी) रद्द करण्यात येईल. त्याऐवजी पर्यायी कर दिला जाणार नाही. सत्ता स्थापनेनंतरच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिले. 
पूना र्मचट चेंबरतर्फे देण्यात येणा:या आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराचे वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. पंचशील रियाल्टीचे चेअरमन अतुल चोरडिया यांना राज्यस्तरीय, तर कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष व उद्योजक कृष्णकुमार गोयल यांना शहर पातळीवरील पुरस्काराने गौरविण्यात आले. बाळासाहेब कर्नावट यांना आदर्श व्यापारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महापौर चंचला कोद्रे, आमदार माधुरी मिसाळ, वेकफिल्ड कंपनीचे प्रमुख मुकेश मल्होत्र, पूना र्मचट चेंबरचे अध्यक्ष वालचंद संचेती, पूना र्मचट चेंबरचे उपाध्यक्ष प्रवीण चोरबेले, सचिव जवाहरलाल बोथरा, सहसचिव अशोक लोढा या वेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, ‘‘जगातील बहुतांश देशांत बहुविध करप्रणाली नाही. त्यामुळे यापुढील काळात ही प्रणाली बदलावी लागेल. केवळ दोन ते तीन प्रकारच्या करप्रणाली स्वीकारून अर्थव्यवस्था संचालित करावी लागेल. व्यापा:यांना देखील विविध करप्रणालींचा त्रस होत आहे. जकात हटविताना एलबीटी हटविण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही. आगामी निवडणुकीत संधी दिल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत एलबीटी हटविण्यात येईल. कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा, अन्नसुरक्षा मानदे कायदा यातील त्रुटीदेखील दूर करण्यात येतील. 
देशात संक्रमणावस्था असून, उद्योग-व्यापार जगतात नैराश्याचे वातावरण आहे. त्यात आत्मविश्वासाचे वातावरण 
निर्माण केले पाहिजे. अर्थव्यवस्था संचालित करणारे, तसेच रोजगार निर्माण करणारे व्यापारीदेखील सैनिकांप्रमाणोच देशभक्त असल्याचे ध्यानात घेतले पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. 
स्वत:चा मासिक ताळेबंद तयार कर, महिनाअखेरीस काय गमावले काय कमावले याचा विचार कर, असा वडिलांनी दिलेला सल्ला बिझनेस मंत्र ठरल्याचे अतुल चोरडिया यांनी पुरस्काराला उत्तर देताना सांगितले. 
(प्रतिनिधी)
 
4किराणा व्यवसायापासून सुरुवात करीत विविध उद्योगांची उभारणी केली. प्रामाणिकपणा व कष्टाची तयारी असल्यास कोणत्याही क्षेत्रत यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे व्यावसायिकांनी एकाच व्यवसायावर अवलंबून न राहता इतर क्षेत्रतही ठसा उमटवावा, असा सल्ला कृष्णकुमार गोयल यांनी दिला. 
 
4जकात हटविताना एलबीटी हटविण्याचे आश्वासन सरकारने पाळले नाही.
4अर्थव्यवस्था संचालित करणारे व्यापारीदेखील सैनिकांप्रमाणोच देशभक्त आहेत.