मुक्तछंद संस्थेचे स्व.प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार जाहीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 18:41 IST2018-10-20T18:36:06+5:302018-10-20T18:41:02+5:30

मुक्तछंद संस्थेच्या वतीने प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ३०आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे.

late Pramod Mahajan Smriti Award declared | मुक्तछंद संस्थेचे स्व.प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार जाहीर 

मुक्तछंद संस्थेचे स्व.प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार जाहीर 

ठळक मुद्देपुरस्काराचे हे आठवे वर्ष; विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरव

पुणे: मुक्तछंद संस्थेच्या वतीने प्रमोद महाजन स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा ३०आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार मेधा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
 यंदाच्या वर्षीचा पुरस्कार अप्पर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, जर्मनीतील मानाचा डाड संस्थेतर्फे देण्यात येणारा क्रॉस आॅर्डर आॅफ मेरिट पुरस्कार विजेते डॉ अरविंद नातू, किल्लारी भूकंपातील मिरॅकल बेबी प्रिया जवळगे, बचाव पथक प्रमुख लेफ्टनंट कर्नल सुमित बक्षी यांना देण्यात येणार आहे. पुरस्काराचे हे आठवे वर्ष असून गेली सात वर्षे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर, ज्येष्ठ विधींज्ञ उज्वल निकम, तीन तलाक विरुद्ध लढा देणाऱ्या शायरा बानो, अशा मान्यवरांना देण्यात आला आहे.

Web Title: late Pramod Mahajan Smriti Award declared

टॅग्स :Puneपुणे