Ladki Bahin Yojana September 2025 Installment Date: लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे. कारण, सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये नेमके कधी मिळणार, याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. एकीकडे राज्यातील अतिवृष्टीने शेतकरी, सामान्य जनता त्रस्त झाली आहे. बिकट परिस्थितीत दिवाळी कशी साजरी करायची, असा प्रश्न समोर उभा राहिला आहे. त्यातच ऐन दिवाळीच्या तोंडावर लाडकी बहीण योजनेचे हे पैसे मिळणार असल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरली. ही योजना जाहीर झाल्यापासून विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. तसेच विविध दावे करत आहेत. असे असले तरी ही योजना सुरूच राहणार असल्याची ग्वाही महायुती सरकारकडून दिली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रुपये दिले जातात. हे पैसे लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होत असतात. आता लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरी अद्याप जमा झालेला नाही. सप्टेंबरचा निधी कधी मिळणार? याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले होते.
लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार, सप्टेंबरचे १५०० रुपये लवकरच मिळणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस १० ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील २ महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती!, असेही तटकरे यांनी म्हटले आहे.
Web Summary : Good news for beneficiaries of the Ladki Bahin Yojana! The ₹1500 installment for September will be distributed starting October 10th. Minister Aditi Tatkare announced the funds will soon be deposited into beneficiaries' accounts. E-KYC update requested.
Web Summary : लाडली बहन योजना के लाभार्थियों के लिए खुशखबरी! सितंबर की ₹1500 की किस्त 10 अक्टूबर से वितरित की जाएगी। मंत्री अदिति तटकरे ने घोषणा की कि जल्द ही लाभार्थियों के खातों में धनराशि जमा की जाएगी। ई-केवाईसी अपडेट का अनुरोध किया गया है।