आता ‘लाडक्या बहिणीं’ची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; 'या' बाबी तपासल्या जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 09:34 IST2026-01-21T09:34:12+5:302026-01-21T09:34:27+5:30

ई-केवायसीची मुदत डिसेंबरमध्ये संपली

Ladki Bahin Yojana maharashtra govt decided to conduct physical verification beneficiaries with such details | आता ‘लाडक्या बहिणीं’ची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; 'या' बाबी तपासल्या जाणार

आता ‘लाडक्या बहिणीं’ची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचा निर्णय; 'या' बाबी तपासल्या जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी माहिती ही एक्स या समाज माध्यमावर दिली. लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ई केवायसीची मुदत देण्यात आली होती.

योजनेचे संकेतस्थळ बंद

लाडकी बहीण योजनेचे संकेतस्थळ बंद असल्याने राज्यातील लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीमधील त्रुटींची पूर्तता रखडली आहे. वाशिमसह राज्यातील अनेक लाभार्थींच्या ई-केवायसीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांचे अनुदान थांबले आहे.

'या' बाबी तपासणार

लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे आणि ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे, लाभार्थी पात्र महिलाच असावी, तिचा पती सरकारी कर्मचारी नसावा, याचीही पडताळणी केली जाणार आहे.

Web Title : लाड़की बहिन योजना: पात्रता जाँचने के लिए अब सीधा सत्यापन

Web Summary : लाड़की बहिन योजना की जाँच; सीधा सत्यापन पात्रता की जाँच करेगा। आंगनवाड़ी कार्यकर्ता लाभार्थियों की उम्र, वैवाहिक स्थिति और सरकारी रोजगार की जाँच करेंगे। ई-केवाईसी त्रुटियों ने भुगतान रोक दिया। वेबसाइट की समस्याएँ सुधार में देरी करती हैं। ई-केवाईसी की अंतिम तिथि 31 दिसंबर, 2025 है।

Web Title : Ladki Bahin Scheme: Direct Verification to Check Eligibility Now

Web Summary : Ladki Bahin scheme faces scrutiny; direct verification will check eligibility. Anganwadi workers verify beneficiaries' age, marital status, and government employment. E-KYC flaws halted payments. Website issues delay corrections. The deadline for E-KYC is December 31, 2025.