हुसेन मेमन,
जव्हार- निधीअभावी पालघर जिल्हयातील अनेक आदिवासी बालकांचा कुपोषणाने बळी जात असतांना ५९ लाखांचा निधी मात्र पडून असल्याचे भयावह वास्तव समोर आले आहे. त्यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सकांना उपलब्ध करून दिलेल्या २७.४७ लाखांचा व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या ३२.७६ लाखांचा समावेश आहे. याशिवाय या वर्षात करोडो रूपये खर्च होवून देखील कुपोषण का थांबले नाही असा प्रश्नही निर्माण झाला आहे. पालघर जिल्हयात या वर्षात कुपोषण निर्मूलनासाठी झालेल्या खर्चाची आकडेवारी कट्यावधीत असली तरी त्याची फलनिष्पत्ती मात्र आजीबात दिसून येत नाही.भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजना दि.१८ नॉव्हेंबर २०१५ पासून सुरू झालेली असून पालघर जिल्हयात सन २०१५-१६ करीता १ कोटी ७० लाख तर २०१६-१७ मध्ये ८ कोटी २ लाख ५० हजार महिला व बाल कल्याण अधिकारी, जि. प. पालघर यांना वितरीत केले आहे. नाविन्यपूर्ण योजनेतून सर्वसाधारण बालकांसाठी सन २०१५-१६ मध्ये २७ लाख ३४ हजार तर सन २०१६-१७ मध्ये १ कोटी ५० लाख रुपये अंडी व केळी हा पोषक आहार देण्याकरीता निधी वितरीत करण्यात आलेले आहे. ग्रामविकास केंद्राकरीता नाविन्यापूर्ण योजनेतून सन २०१५-१६ मध्ये २० लाख ४०हजार जिल्हा आरोग्य अधिकारी यांना वितरीत करण्यात आले आहे. मात्र सन २०१६-१७ मधील निधी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना, जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांचे मार्फत वितरीत करण्यात आलेली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना सन २०१५-१६ मध्ये ९ कोटी रूपये औषध खरेदी, दृष्टीदान योजना, आहार सुविधा, देखभाल व दुरूस्तीकरीता उपलध करून देण्यात आलेले आहेत. तर सन २०१६-१७ करीता २७ लाख ४७ हजार तरतूद उपलब्ध आहे, मात्र प्रस्ताव प्राप्त नसल्यामुळे निधी वितरीत नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सन २०१५-१६ मध्ये २२ कोटी ९४ लाख संवेदनशिल आदिवासी भागात विशेष सेवा पुरविणे, औेषधे खरेदी करणे, दाई बैठक, बांधकाम व दुरूस्ती इत्यादी योजनेकरीता निधी वितरीत असून ३२ लाख ७६ हजाराची भरीव तरतूद पडून आहे. ही माहिती प्रकल्प अधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिली आहे. >कुटीरमध्ये वर्षभरात १७६ सॅम-मॅम बालके दाखल जव्हार येथील कुटीररूग्णालयात सन २०१६-१६ या वर्षात सॅमचे १६३ व मॅमचे १३ रूग्ण दाखल झाले होते, त्यांना सॅम व मॅमच्या प्रोटोकोल नुसार योग्य उपचार देऊन त्यांच्या वजनात वाढ झाल्यानंतर रूग्णालयातून सुखरूप घरी पाठविण्यात आलेले आहे अशी माहीती वैद्यकिय अधिक्षक डॉ. रामदास मराड यांनी दिली. अज्ञान, अंधश्रद्धा, बुवाबाजी, शिक्षणाचा अभाव, गरीबी या गोष्टीं कुपोषणाला कारणीभूत आहेत, आरोग्य खाते त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत असले तरी त्या मागे खेचण्याचे काम या गोष्टी करीत आहेत. स्वयंसेवी संस्थांकडून दारीद्रय, निमूर्लन करणे, रोजगार निर्मित करणे गरजेचे आहे. अशी माहिती पुणे येथील राज्य कुटुंब कल्याण आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. पी. वाय. वाघमारे यांनी लोकमतला दिली.>प्रशासन म्हणते, कुपोषणाला कुटुंबच जबाबदारजव्हार तालुक्यातील रुईघर बोपदरी येथील २ वर्षांचे कुपोषित बालक अतितीव्र अवस्थेत सोमवारी पतंगशाहा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यावर डॉ. रामदास मराड यांच्या मार्गदर्शनाखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. राहुल काशीराम वाडकर या २ वर्षांच्या मुलाचे वजन फक्त ५ किलो आहे. हे बालक गेल्या महिनाभरापासून अतितीव्र अवस्थेत असून, त्याला उपचाराची गरज असल्याने, येथील आशा कार्यकर्त्या- संगीता किरिकरे यांनी दवाखान्यात दाखल करण्यासाठी पालकांना सांगितले.मात्र आई त्याला नातेवाईकांकडे घेवून गेली आणि रविवारी परत आली. किरकिरे या पुन्हा त्यांच्याकडे गेल्या असता, त्याची आई जंगलात लाकडे आणायला जाते म्हणून बाळासह गेली ती दिवसभर आलीच नाही. त्यामुळे किरकिरे यांनी तिचा शोध जंगलात घेऊन हे बाळ त्यांनीच रुग्णालयात बळजबरीने दाखल केले. >ग्रामीण रूग्णालयात उपचार केंद्रकुपोषित बालकांवर १४ दिवस उपचारतालुक्यात अतितीव्र बालकावर उपचार करण्याकरता ग्रामीण रूग्णालयात बाल उचार केंद्र सुरू असून यामध्ये ९ बालकांवर १४ दिवस बालकाच्या वजन वाढीसाठी उपचार केले जाणार आहे. ० ते ६ वयोगटातील हे कुपोषित बालक कमी वजनाचे असून या बाल उचार केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली त्याच बरोबर त्यांच्या मातानाही खर्च करण्यात येणार आहे.तालुक्यात अतितिव्र बालकांची संख्या ९६ असून तीव्र मॅम ची ३९८ एवढी आहे या तालुक्यात तीन प्राथमिक आरोग्य केंद्रात एकात्मिक बाल विास केंद्राच्या ९० बीट असून या दहाही केंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सीव्हीडीसी बाल उपचार केंद्र निधी अभावी सुरू झालेली नाहीत कुपोषणाची एवढी मोठी आकडेवारी असताना हे बाल उचार केंद्र का सुरू होत नाही, तरी या बालकाच्या वजनात वाढ होण्यासाठी लवकरात लवकर बाल उचार केंद्र सुरू करावीत.