शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 07:11 IST

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला.

पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ५१ जण जखमी असून, सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. युद्धपातळीवर सुरू झालेले मदत व शोधकार्य अंधार झाल्यावर थांबवण्यात आले. 

रविवारी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १००-१५० पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहून  नदीतून वाहणारे पाणी बघत होते. त्यांच्या वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. पुलावरील अनेकजण पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. काही तरुणांनी वाहून जाणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच तळेगाव पोलिस, अग्निशामक दलाची पथके, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. घटनास्थळाजवळ गर्दी झाली होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते.

कुंडमळा हे तळेगाव दाभाडे शहरापासून जवळ असलेले पावसाळी पर्यटनस्थळ आहे. कुंडमळा हे पुण्यापासून सुमारे ३० किमी अंतरावर आहे. मुंबईकडे जाताना, एक्सप्रेस वेवर प्रवेश करण्यापूर्वी मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावच्या मध्ये हे ठिकाण लागते. येथे कुंडमळा धबधबा लोकप्रिय आहे. इंद्रायणी नदीतील कातळामध्ये नैसर्गिकरीत्या तयार झालेले खोलगट पाण्याचे कुंड, रांजणखळग्यांमुळे या परिसरास कुंडमळा म्हटले जाते. नदीवर जुना अत्यंत अरुंद लोखंडी साकव आहे. त्याच्या दोन्ही बाजू सिमेंटच्या पुलाने जोडल्या आहेत. या ठिकाणी मोठी वाहने जाऊ शकत नाही. पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.पूल कोसळला तेव्हा पुलाखालीही काहीजण बसले होते. पूल कोसळल्याने त्याखाली काहीजण दबले गेले असण्याची शक्यता आहे. सायंकाळी क्रेन आणून सांगाडा काढण्याचे काम सुरू होते.

सायंकाळी एनडीआरएफचे पथक आल्यानंतर बचावकार्यास गती आली. अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी १५ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. चौकशी समिती स्थापन, कठोर कारवाई करणार या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

दहा दिवसांपूर्वीच निघाले मनाई आदेशअपघात झालेला कुंडमळा पूल जीर्ण अवस्थेमुळे दोन महिन्यांपूर्वीच बंद करण्यात आला होता. ३५ वर्षे जुना पूल असल्याने पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली. त्याच्या दुरुस्तीसाठी निधीही मंजूर झाल्याचे समजते.पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले की, दहा दिवसांपूर्वीच पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आदेश प्रशासनाकडून काढण्यात आले होते. ५ लाख रुपयांची मदत : ज्या पर्यटकांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

देवेंद्र फडणवीस शोकाकूळपुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकून अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार ४ लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली.

पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांनी व्यक्त केले दु:ख पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून माहिती घेतली आणि दुःख व्यक्त केले.  

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस