कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 03:23 AM2018-01-23T03:23:19+5:302018-01-23T03:23:34+5:30

Koregaon Bheema Dangal Case: Milind Ekboten's bail plea rejected | कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला

Next

पुणे : कोरेगाव भीमा येथे दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (६१, रा. शिवाजीनगर) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधीश प्रल्हाद भगुरे यांनी फेटाळला. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम १८नुसार अटकपूर्व जामिनाची तरतूद नाही. त्यानुसार न्यायालयाने हा जामीन फेटाळला आहे.
१ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी संपूर्ण राज्यातून हजारोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी आले होते. त्या वेळी तेथे दगडफेक, जाळपोळ झाली होती. ही दंगल घडवून आणल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल आहे.

Web Title: Koregaon Bheema Dangal Case: Milind Ekboten's bail plea rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.