शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोपर्डी’चे राजकारण नको

By admin | Updated: September 2, 2016 01:33 IST

कोपर्डीची घटना वाईट आहे. गुन्हेगाराची जात असू शकत नाही. तो गुन्हेगारच असतो. आज जे मोर्चे निघतात तो आक्रोश आहे. याचा दुसरा अर्थ कोणी काढू नये. मराठा समाजाने मोर्चे

मुंबई : कोपर्डीची घटना वाईट आहे. गुन्हेगाराची जात असू शकत नाही. तो गुन्हेगारच असतो. आज जे मोर्चे निघतात तो आक्रोश आहे. याचा दुसरा अर्थ कोणी काढू नये. मराठा समाजाने मोर्चे काढत संयम पाळला. मात्र अशा प्रकरणाचे राजकारण होता कामा नये, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक महिलेच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन केले.माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा मंत्रिपद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.सत्काराला उत्तर देताना आठवले म्हणाले, की कोपर्डी प्रकरणात आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना पकडून दिले. ज्यांनी अत्याचार केले, खून केले ते लोक आमचे नाहीत. त्यांना फाशी झालीच पाहिजे. मराठा समाजाने मोर्चे काढले. आम्हीपण मोर्चे काढू. माझ्याकडे केंद्राचे सामाजिक न्याय खाते असले तरी कायदा हा कोणावर अन्याय करण्यासाठी नाही. त्यामुळे कायदा रद्द करण्याचा प्रश्नच येत नाही. जातीय वादातून अत्याचार होत असले तरी अ‍ॅट्रॉसिटी कायदा अबाधित राहणार. रामदास आठवले कोण आहे? असा प्रश्न काही लोक उपस्थित करतात. ‘आठवले हा माणसाला जोडणारा फोन आहे. आठवले दलित चळवळीचा बोन आहे’, असं त्यांनी म्हणताच टाळ््यांचा कडकडाट झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान बदलतील, असे लोक म्हणतात. पण संविधान बदलण्यापेक्षा तुम्ही बदला, असेही ते म्हणाले. कोपर्डीच्या निमित्ताने वातावरण गढूळ करण्याचे काम कोणी करू नये. हे पुरोगामी महाराष्ट्राला ते शोभणारे नाही, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले. अविनाश महातेकर म्हणाले, की कोपर्डीचे राजकारण सुरु आहे. दंगली पेटवण्याचे राजकारण आम्ही होऊ देणार नाही. (प्रतिनिधी)