कोकण रेल्वेचे असहकार्य!
By Admin | Updated: May 30, 2014 02:06 IST2014-05-30T02:06:28+5:302014-05-30T02:06:28+5:30
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचा भीषण अपघात अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करीत आहेत. मात्र, चौकशीस कोकण रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
_ns.jpg)
कोकण रेल्वेचे असहकार्य!
मुंबई : दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनचा भीषण अपघात अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी करीत आहेत. मात्र, चौकशीस कोकण रेल्वेकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे चौकशीला विलंब होत आहे. दरम्यान याविषयी कोकण रेल्वेच्या अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलणे टाळले. नागोठणे-रोहादरम्यान दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला नुकताच अपघात झाला होता. या अपघातात २२ जणांना आपले प्राण गमवावे लागले, तर अनेक जण जखमी झाले. अपघाताची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. त्यानुसार, या अपघाताची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत रेल्वे पोलीस, कर्मचारी आणि प्रवासी असे ३0 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र, अपघाताची माहिती मध्य आणि कोकण रेल्वेकडून मिळणे गरजेचे असल्याने तशी माहिती देण्याच्या सूचना आयुक्त बक्षी करीत आहेत. मध्य रेल्वेकडून चौकशी पूर्ण करण्यासाठी लागणारी माहिती दिली असून कोकण रेल्वेकडून अद्याप काही माहिती येणे बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोकण रेल्वेची आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही जबाबदारी पाडली जात होती की नाही आणि इतर काही माहिती मागितली आहे. मात्र, ती अद्यापही मिळाली नसल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त बक्षी यांनी सांगितले. आतापर्यंत चौकशीच्या पाच फेर्या झाल्या असून यामध्ये तीन वेळा त्यांना माहिती देण्याबाबत पत्र पाठवण्यात आले होते. मात्र, तरीही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची खंत बक्षी यांनी व्यक्त केली. आता कोकण रेल्वेने चौकशीला मदत होईल, अशी माहिती लवकरच देऊ, असे आश्वासन दिले असून त्यांच्याच प्रतिसादाची आम्ही वाट पाहत असल्याचे ते म्हणाले.