Holi 2026 ST Bus: होळी हा संपूर्ण देशात साजरा केला जाणारा विशेष सण आहे. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. कोकणात होळीचा उत्सव महत्त्वाचा मानला जातो. शिमगा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शिमगोत्सवासाठी हजारो कोकणवासी आवर्जून गावी जातात. शिमगोत्सव, होळीसाठी प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता ‘लालपरी’ सज्ज झाली आहे. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा फेऱ्या सोडण्याचे नियोजन एसटी महामंडळाचे असून, पैकी बहुतांश सेवा या आताच फुल्ल झाल्याचे म्हटले जात आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ होळीचा सण कोकणवासीयांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एसटीची होळी जादा वाहतूक गुरुवारपासून सुरू झाली. मुंबई विभागातून ७८, तर ठाण्यातून ९१ जादा एसटीचे आरक्षण फुल्ल झाले. मुंबई, ठाणे, पालघर या भागातून अनेक जण आपल्या कुटुंबासह होळीचा सण साजरा करण्यासाठी मूळ गावी कोकणात जातात.
मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समूह आरक्षण
मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा, पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण या भागात जादा एसटी धावणार आहेत. या गाड्या नियमित फेऱ्याव्यतिरिक्त आहेत. इतर वाहतूक सुविधांपेक्षा नागरिकांना एसटी अधिक जवळची वाटते. कारण ती त्यांना थेट त्यांच्या वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे ग्रुप बुकिंगकडे जास्त ओढा असतो. मुंबईतील ७८ पैकी ३९ बसचे समूह आरक्षण झाले आहे.
दरम्यान, एसटी महामंडळाने होळीनिमित्त १९८ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले. यात ग्रुप बुकिंग, वैयक्तिक बुकिंगचा समावेश असून, सर्वाधिक बुकिंग २८ फेब्रुवारीचे असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. २८ फेब्रुवारी, १ मार्चला तब्बल १५० फेऱ्या नियोजित केल्या आहेत. एकूण फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी राखीव ठेवल्या आहेत.
Web Summary : Konkan-bound ST bus services for Holi 2026 are fully booked, especially from Mumbai and Thane. Demand is high due to direct access to villages. The ST Corporation planned 198 special trips between February 27th and March 5th, with most bookings for February 28th.
Web Summary : होली 2026 के लिए कोंकण जाने वाली एसटी बसें पूरी तरह से बुक हो चुकी हैं, खासकर मुंबई और ठाणे से। गांवों तक सीधी पहुंच के कारण मांग अधिक है। एसटी निगम ने 27 फरवरी से 5 मार्च के बीच 198 विशेष यात्राओं की योजना बनाई है, जिनमें से अधिकांश बुकिंग 28 फरवरी के लिए हैं।