शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कोकणची एसी डबल डेकर ट्रेन दक्षिणेला चालवण्याचा घाट

By admin | Updated: December 24, 2014 02:32 IST

कोकणवासियांसाठी चालवण्यात आलेली विशेष एसी डबल डेकर ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण विभागात (चैन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, पलक्कड, थिरुवनंतपुरम) चालवण्याचा घाट घालण्यात येत

सुशांत मोरे, मुंबईकोकणवासियांसाठी चालवण्यात आलेली विशेष एसी डबल डेकर ट्रेन रेल्वे प्रशासनाकडून दक्षिण विभागात (चैन्नई, मदुराई, तिरुचिरापल्ली, सालेम, पलक्कड, थिरुवनंतपुरम) चालवण्याचा घाट घालण्यात येत आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्नही सुरू असल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. कोकणवासियांसाठी फक्त दोन वेळा धावलेल्या या ट्रेनला रेल्वेच्या नियोजशून्य कारभारामुळे कमी प्रतिसाद मिळाला होता आणि त्यानंतर ही ट्रेन धावलीच नाही. सध्या कांदिवली येथील यार्डमध्ये उभ्या असलेल्या एसी डबल डेकर ट्रेनचा मुक्काम देखभाल आणि दुरुस्तीसाठी लोअर परेल येथील वर्कशॉप होणार आहे. ही ट्रेन पुन्हा कोकण मार्गावर सुरू ठेवायची की नाही यावर महिनाभरानंतर निर्णय होईल. गणपतीत ही गाडी सुरू करण्यात आली. मात्र कोकणात जाणाऱ्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला या प्रिमियम ट्रेनमुळे मोठी कात्रीच लागणार असल्याने त्याकडे पाठ फिरवण्यात आली. त्यामुळे दिवाळीत ही ट्रेन नॉन प्रिमियम म्हणून चालवण्यात आली. मात्र कमी प्रतिसादामुळे सेवा थांबवण्यात आली आणि देखभाल-दुरुस्तीसाठी ती पश्चिम रेल्वेकडे सोपवण्यात आली. ही ट्रेन येत्या तीन ते चार दिवसांत लोअर परेल वर्कशॉपमध्ये परिक्षण आणि दुरुस्तीसाठी येईल. त्यासाठी बराच वेळ लागणार असल्याने साधारणपणे एक ते सव्वा महिना ती वर्कशॉपमध्ये मुक्काम करणार असल्याचे रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे हा मुक्काम झाल्यावर ही ट्रेन कोकण मार्गावर विशेष ट्रेन म्हणून पुन्हा सुरू करायची की नाही याचा विचार रेल्वे प्रशासनाकडून वरिष्ठ पातळीवर केला जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वेकडून एसी डबल डेकर ट्रेन दक्षिण विभागात चालवण्याचा घाटही घातला जात आहे. त्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चाही सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही संपूर्ण ट्रेन दक्षिण विभागात चालवायची कि त्याचे काही डबे हलवायचे यावरही विचार केला जात आहे. एसी डबल डेकर ट्रेन पुन्हा कोकणवासियांना कधी पाहण्यास मिळेल हादेखिल मोठा प्रश्न आहे. मात्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे कोकणाशी जवळचे नाते असल्याने ते काय निर्णय घेतात यावर सर्व अवलंबून असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. ‘एसी डबल डेकर लोअर परेल वर्कशॉप देखभालीसाठी जाणार आहे. हे नक्की आहे. मात्र ही ट्रेन दक्षिणेकडे चालवण्याचा विचार नाही,’ अशी माहिती जनसंर्क अधिकारी ए.के.सिंह यांनी दिली.