शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

दरडोई निव्वळ उत्पन्नात कोल्हापूरची भरारी; राज्यात टॉप टेनमध्ये समावेश

By भीमगोंड देसाई | Updated: March 9, 2026 12:21 IST

महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालातून पुढे : शेती उत्पादन, संपर्क यंत्रणा सक्षम झाल्याने सकारात्मक परिणाम

भीमगोंडा देसाई कोल्हापूर : राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नाच्या यादीत कोल्हापूर जिल्हा टॉप टेनमध्ये आला आहे. राज्यात पहिल्या क्रमांकावर मुंबई, तर सहाव्या क्रमांकावर कोल्हापूर आहे. राज्यात सर्वांत कमी उत्पन्नाचा जिल्हा नंदूरबार आहे. दरम्यान, पुणे विभागात कोल्हापूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. शिवाय कोल्हापूरचे दरडोई उत्पन्न सन २०२३-२४च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये ३५ हजार २६३ रुपयांनी वाढले आहे. जिल्ह्यातील औद्योगिक, कृषी, दुग्धव्यवसाय, सेवा क्षेत्रातील सातत्यामुळे उत्पन्नवाढीचा वेग कोल्हापूरने कायम ठेवला आहे.राज्य शासनाचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नात सन २०२१-२२ च्या तुलनेत सन २०२४-२५ मध्ये १ लाख १ हजार ८०८, तर पुण्याची १ लाख ३३ हजार ८१७ रुपयांची वाढ झाली आहे.साखर उद्योग, दुग्धव्यवसाय, लघू आणि मध्यम उद्योगांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत आहे. शहर आणि परिसरात विकसित झालेल्या औद्योगिक वसाहती, उद्योगांचा विस्तार, फाउंड्री हब, शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील उद्योग, हुपरीतील चांदी व्यवसाय, इचलकरंजीतील वस्त्रोद्याेग, बांधकाम क्षेत्राचा विस्तार, व्यापार क्षेत्रामुळे जिल्ह्याच्या उत्पन्नात वाढ होत आहे.

सन २०२४-२५ मधील राज्यातील निव्वळ दरडोई उत्पन्नातील जिल्हे अनुक्रमे कंसात उत्पन्नाची आकडेवारी अशी :मुंंबई (५१७८७५) , ठाणे (४४४२८३), पुणे (४२६७२०), नागपूर (३६७८०५), रायगड (३५७५८१), कोल्हापूर (३२४४४४), सांगली (३०४२३३), नाशिक (३००२६०), सोलापूर (२८९५५८), छत्रपती संभाजीनगर (२७९९३०).

...तर ‘कोल्हापूर नंबर वन’वरपुणे विभागात पाच जिल्हे येतात. निव्वळ दरडाेई उत्पन्नात पुणे एक नंबरला, तर कोल्हापूर निव्वळ दरडोई उत्पन्नात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे विभाग आणि राज्यात मेट्रो, काॅर्पोरेट आणि बहुउद्देशीय कंपन्या असलेली शहरे दरडोई उत्पन्नात आघाडीवर आहेत, याची उणीव कोल्हापूर जिल्ह्यात दिसते.

मोठे उद्योग, दळणवळणाच्या सुविधा चांगल्या असतील तर रोजगारनिर्मिती वाढते. दरडोई उत्पन्नात भर पडते. कोल्हापूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात संपर्काच्या यंत्रणा सक्षम झाल्या आहेत. शेतीआधारित उद्योग वाढत आहेत, आदी कारणांमुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या निव्वळ दरडोई उत्पन्नात वाढ झाली आहे. कोल्हापुरात एखादी मोठी बहुउद्देशीय कॉर्पोरेट कंपनी आली तर पुन्हा कोल्हापूरचे स्थान राज्यात वर असेल. - विजय ककडे, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, कोल्हापूर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur's Net Per Capita Income Soars, Enters State's Top Ten

Web Summary : Kolhapur's net per capita income surged, securing a spot in Maharashtra's top ten. Driven by industry, agriculture, and dairy, it saw a significant rise from 2023-24 to 2024-25, placing it second in the Pune division.