सिंधुदुर्गात ‘कोकण चित्रपट महोत्सव’, कलाकारांच्या प्रयत्नांना यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 08:34 IST2023-11-05T08:34:09+5:302023-11-05T08:34:26+5:30
सिंधुरत्न कलावंत मंचच्या वतीने यंदा ११ ते १६ डिसेंबरदरम्यान कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे.

सिंधुदुर्गात ‘कोकण चित्रपट महोत्सव’, कलाकारांच्या प्रयत्नांना यश
कोकणातील कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपावा, तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी, या उद्देशाने गत वर्षापासून कोकण चित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली आहे.
सिंधुरत्न कलावंत मंचच्या वतीने यंदा ११ ते १६ डिसेंबरदरम्यान कोकण चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे. कोकण चित्रपट महोत्सवाचे हे दुसरे वर्ष आहे. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच ११ डिसेंबरला सिंधुदुर्गात महोत्सवाचा उद्घाटन सोहळा होणार असून, त्यानंतर मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होईल.
१२ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये उद्घाटन सोहळा आणि चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपटांचे प्रदर्शन होईल. १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन केले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते सहभागी होणार आहेत.