शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

“माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव”

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 13:35 IST

shortage of remdesivir: माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव असल्याची टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्ररात्री दोन वाजता दोन मंत्र्यांना सोबत घेऊन फिरावं लागणं दुर्दैव - महापौरमुख्यमंत्री वेगवेगळ्या उपाययोजना करतायत - महापौर

मुंबई: देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असल्याचे आढळून येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती अधिकच गंभीर असून, अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे कोरोना रुग्णांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुरे पडत आहेत. कोरोनामुळे होणारे मृत्यूही वाढताना दिसत आहे. कोरोनासह राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही वाढताना दिसत आहेत. एकीकडे सरकार कोरोना स्थितीशी दोन हात करत असताना, विरोधी भाजपसह अन्य पक्ष सातत्याने टीका करताना दिसत आहेत. याला सरकारकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. अशातच आता माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन धावाधाव करतात, हे मोठं दुर्दैव असल्याची टीका करण्यात आली आहे. (kishori pednekar criticized devendra fadnavis on shortage of remdesivir injection issue)

राज्यातील परिस्थिती पाहता सर्वांनी एकत्रित येऊन लढा दिला पाहिजे. पण तसे दिसत नाही. विरोधक खूपच आक्रमक झालेले आहेत. योद्धा म्हणून काम करायला तयार नाहीत. परिस्थिती अधिकाधिक कशी बिकट होईल, यासाठी लक्ष दिले जात आहे, अशी बोचरी टीका मुंबईच्या महापौरकिशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना किशोरी पेडणेकर यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 

आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान

हे किती मोठं दुर्दैव आहे

एकीकडे खूपच कठीण परिस्थितीतून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील जनता जात आहे. जबाबदारी काम केल्यास यातून निश्चितच बाहेर पडू. रेमडेसिवीरचा साठा पकडल्यानंतर माजी मुख्यमंत्री रात्री दोन वाजता पोलीस ठाण्यात जातात. त्यांचा उद्देश काहीही असेल. परंतु, महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांना रात्रीच्या दोन वाजता दोन-दोन मंत्री घेऊन जावे लागत आहे, हे किती मोठे दुर्दैव आहे. मुंबईत साठा पकडला गेला आहे. लोक वणवण भटकत आहे आणि हे काय चालले आहे, अशी विचारणा पेडणेकर यांनी यावेळी केली. 

सीरमला ३ हजार कोटी देणार; लस उत्पादन वाढवण्यासाठी केंद्राचा निर्णय

मुख्यमंत्री वेगवेगळ्या उपाययोजना करतायत

महाराष्ट्र बिकट परिस्थितीत चालला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांची टीम वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. परिस्थिती नियंत्रणात तसेच सुलभ होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे. ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी चालक कमी पडत असल्याने परिवहन मंत्री त्यासाठी काम करत आहे. महापालिका आयुक्तांनी ऑक्सिजन उत्पादकांनाही आदेश दिले आहेत, असे किशोरी पडणेकर यांनी म्हटले आहे.  

पाच किंवा त्याहून जास्त कोरोना रुग्ण असलेली बिल्डिंग 'मायक्रो कंटेन्मेंट झोन'; नियम मोडल्यास दंड

दरम्यान, संचारबंदी, जमावबंधी आणि कडक निर्बंध लावूनही जनतेला कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. राज्यात १ मे पर्यंत लावण्यात आलेली संचारबंदी आणि निर्बंध वाढवावे लागणार असल्याचे संकेत दिले जात आहेत. तसेच कडक लॉकडाऊन लावण्याचा विचार असून, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इतरांशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतील, अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.   

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMayorमहापौरKishori Pednekarकिशोरी पेडणेकरState Governmentराज्य सरकारPoliticsराजकारण