किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 15:21 IST2024-08-27T15:21:02+5:302024-08-27T15:21:45+5:30
Kirit Somaiya Video: भाजपचे नेते किरीट सोमय्या दहीहंडीच्या कार्यक्रमात सहभागी होत जोरदार सेलीब्रेशन केले. सोमय्यांनी भरभर वर चढून दहीहंडी फोडली.

किरीट सोमय्यांनी भरभर चढत फोडली दहीहंडी; किती लागले होते थर?
kirit Somaiya Dahi handi video:मुंबई, ठाण्यासह राज्यातील विविध भागात गोकुळाष्टमी जोरात साजरी होत आहे. अनेक ठिकाणी दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राजकीय नेत्यांनीही दहीहंडीच्या कार्यक्रमांना हजेरी लावली. यात भाजपचे नेते किरीट सोमय्यांही मागे नव्हते. मुंबईतील भांडुपमध्ये सोमय्यांनी चार थर भरभर चढत दहीहंडी फोडली.
मुंबई-ठाण्यासह राज्यात दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने लाखो रुपयांची बक्षिसे ठेवत नेत्यांनी दहीहंड्यांचे आयोजन केले आहे. अनेक ठिकाणी कलाकारांच्या नृत्याचे कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत.
आधी फोडली दहीहंडी नंतर गाण्यावर धरला ठेका
भाजपचे नेते किरीट सोमय्या नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावून आनंद घेताना दिसतात. दहीहंडीच्या कार्यक्रमांना ते दिसतातच. यावेळीही सोमय्यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात भाग घेत डान्स केला.
भांडुप पश्चिम मधील जंगल मंगल रोडवर दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोमय्या गोविंदाच्या वेशभूषेत हजर होते.
भांडुप (प.) जंगल मंगल रोड येथे दही हंडी उत्सवात 4 थरावर चढून हंडी फोडताना डॉ. किरीट सोमैया.@BJP4Maharashtrapic.twitter.com/eO0oo97JcH
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 27, 2024
गोविंदांनी तीन थर लावल्यानंतर किरीट सोमय्या वर चढले आणि दंहीहंडी फोडली. दहीहंडी फुटताच सोमय्यांनी जल्लोष करत गाण्यावर ठेका धरला.