शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"माझी हत्या करण्याचा कट, घातपात होणार हे पोलिसांनीच सांगितलं", किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2022 21:28 IST

​​​​​​​दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

दापोली:दापोली तालुक्यातील प्रसिद्ध अशा मुरूड बीचवर असणा-या साई रिसॉर्ट तोडण्यासाठी आलेल्या किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. माजी खासदार निलेश राणे व हजारों कार्यकर्त्यासोबत दापोलीत आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना पोलिसांनी दापोली बसस्थानकासमोर नाक्यावरच अडवले. किरीट सोमय्या खेडहून दापोली येथील साई रिसॉर्टकडे निघाले होते. कुठल्याही प्रकारचा अनर्थ होऊ नये म्हणून पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी किरीट सोमय्या यांचे जंगी स्वागत केले. एका बाजूला किरीट सोमय्या यांना भाजपच्या कार्यकर्त्यांचे समर्थन व दुस-या बाजूने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, हॉटेल व्यवसायिक यांचे निषेध आंदोलन सुरू होते.त्यामुळे दापोलीतील वातावरण चांगलेच तापले होते.

रत्नागिरीचे पालकमंत्री तथा  परिवहन मंत्री अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे बेकायदेशीर आहे. अशी बेकायदेशीर बांधकाम शासननियमानूसार तोडावीच लागतात.तसा शासनाचा नियमच आहे. बेकायदेशीर असणारे साई रिसॉर्ट तोडण्यात यावे, म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मी अनेकदा तक्रारी केल्या, मात्र महाराष्ट्र सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. म्हणून नालाईजाने बेकायदेशीर साई रिसॉर्ट तोडण्यासाठी मला दापोलीत यावे लागले. मी दापोलीत आल्यानंतर पोलिसांनी मला मुरूड येथे जाऊ दिले नाही, मला नाक्यावरच अडवून पोलीस ठाण्यात 1 तास ताडकडत बसवून ठेवले. येथील पोलीस निरीक्षक व पोलीस अधिक्षक हे पालकमंत्र्यांचा दबाबाखाली काम करत आहेत. मी मुरूडला गेलो तर माझी हत्या होऊ शकते, माझा घातपात होऊ शकतो, अशी माहिती मला पोलीसच देत आहेत. मला पोलीसच घाबरवत आहेत, पोलीस कुणाच्यातरी दबावात येऊन मला अडवत आहेत, मला घाबरवत आहेत. जोपर्यंत मंत्री अनिल परब यांच्या वर गून्हा नोंदवला जात नाही तोपर्यंत मी पोलीस ठाण्यातून हलणार  नाही, अशी ठाम भूमिका किरीट सोमय्या यांनी घेतली आहे.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याDapoli Police Thaneदापोली पोलीस ठाणेAnil Parabअनिल परब