Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: किरीट सोमय्या नवनीत राणांच्या मदतीला; खार पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिक जमले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 22:43 IST2022-04-23T22:22:13+5:302022-04-23T22:43:38+5:30
Kirit Somaiya in Khar Police Station: किरीट सोमय्या रात्री खार पोलीस ठाण्यात येणार हे कळल्याबरोबरच शिवसैनिक तिथे जमा झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कारचा ताफा येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

Kirit Somaiya to Meet Navneet Ravi Rana: किरीट सोमय्या नवनीत राणांच्या मदतीला; खार पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिक जमले
खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या मदतीसाठी सांगितल्या प्रमाणे भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी खारच्या पोलीस ठाण्यात हजेरी लावली आहे. यावर राणांच्या आजच्या या कारस्थानाला भाजपाचा पाठिंबा होता हे सिद्ध झाल्याचा आरोप माजी महापौर महाडेश्वर यांनी केला आहे. किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला केला आहे. चप्पल, बाटल्या फेकल्याचे समजते आहे.
किरीट सोमय्या रात्री खार पोलीस ठाण्यात येणार हे कळल्याबरोबरच शिवसैनिक तिथे जमा झाले आहेत. किरीट सोमय्या यांच्या कारचा ताफा येताच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी सोमय्यांना केंद्राचे संरक्षण असल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या गाड्यांना गराडा घातला. किरीट सोमय्या नुकतेच पोलीस ठाण्यात गेले आहेत.
यावर तिथे उपस्थित असलेले माजी महापौर महाडेश्वर यांनी आता खरे काय सुरु होते हे समोर आले आहे. भाजपाचा राणांच्या या कारस्थानामागे हात होता. त्यांचा नेता इथे आल्याने ते आता जनतेसमोर आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, रवी राणांनी जामिन घेण्यास नकार दिला. आपल्याला बेकायदेशीर अटक करण्यात आल्याचे ते म्हणाले.
तत्पूर्वी, रवी राणा यांनी खार पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिवीगाळ केली आहे. पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांनी रवी राणांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याचबरोबर शिवसेनेच्या चार जिल्हाप्रमुखांनी राणा दाम्पत्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान राणा यांच्या वक्तव्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. राणा यांनी लोकांना मुंबईत बोलविण्याचा व्हिडीओ शोधत आहेत.