शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 08:04 IST

शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याचे शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं.

Ramdas Kadam : विधानसभा निवडणुका जवळ येत असतानाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. एका कार्यक्रमात बोलताना रामदास कदम यांनी जुन्या आठवणी सांगत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्याची उद्धव आणि आदित्य ठाकरेंना कल्पना नसल्याचे रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

खेड तालुक्यात बीजघर येथे रविवारी शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. तुमचा पिल्लू मी मंत्री असताना केबिनमध्ये येऊन बसायचा, अशा शब्दात रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली. तसेच आम्ही आमच्या डोक्याला कफन बांधून ५५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलं त्याच मला प्रायश्चित काय मिळालं असा सवालही रामदास कदम यांनी केला.

"ही शिवसेना अशी मोठी झाली नाही, त्यासाठी आजवर अनेकांनी रक्त सांडले आहे. बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी अनेक लोक जीव द्यायला तयार असायचे. त्यांना इतकं प्रेम त्या मातोश्रीवरती मिळत होतं. शिवसेना मोठी करत असताना हजारो शिवसैनिकांच्या हत्या झाल्या. हजारो माता भगिणींचे कुंकू पुसलं गेलं. मराठी माणसांचे न्याय हक्कासाठी स्थापन केलेली बाळासाहेबांची ही शिवसेना अशी मोठी नाही झाली आणि ही शिवसेना मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठे योगदान कोणाचा असेल तर ते कोकणाचा आहे, त्याच कोकणी माणसाला कोकणातल्या नेतृत्वाला संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव आणि आदित्य ठाकरेंना याची कल्पना नाही," अशा शब्दात रामदास कदम यांनी टीका केली.

"मी मंत्री असताना उद्धवजी तुमचा तो पिल्लू आदित्य ठाकरे माझ्या केबिनला येऊन बसायचा. माझ्या मिटिंगमध्ये येऊन बसायचा, काय-काय काम चालतं कसं ते सगळं शिकून घेतलं, मला काका काका म्हणायचा आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. काकाचं खातं घेऊन बसला तुमचा मुलगा आदित्य ठाकरे. आता हाच आदित्य ठाकरे टुणटुण उड्या मारत लोकांना शहाणपणा शिकवतो आहे. अरे कसले पन्नास खोके. एका जरी आमदाराने पन्नास खोके घेतले असतील हे जर सिद्ध केले, तर मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन. नाहीतर तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला या," असं आव्हान रामदास कदम यांनी दिलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ramdas Kadamरामदास कदमUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरे