किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे...

By Admin | Updated: September 30, 2016 18:59 IST2016-09-30T18:59:53+5:302016-09-30T18:59:53+5:30

प्रारंभी लातूरच्या पोलिस पथकाने बिगुल वाजवून श्रध्दांजली वाहिली़ त्यानंतर आठ रायफलीच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़

Killari Mahapalikankar earthquake for 23 years ... | किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे...

किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे...

हवेत रायफलीच्या फैरी झाडून श्रध्दांजली
किल्लारीत काळा दिवस : 
किल्लारी, दि. ३० : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी ८ रायफलीच्या हवेत तीनदा फैरी झाडण्यात आल्या़ गावातील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली़

३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावे उध्दवस्त झाली. यात १० हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले़ मोठी पशूहानी झाली़ या घटनेची आठवण झाली की आजही अंगावर शहारे येतात. शुक्रवारी जुने किल्लारी गावातील स्मृतीस्तंभास तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी सरपंच युवराज गायकवाड, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, सपोनि़ डी़ बी़ वाघमोडे, प्रा़ डॉ़ संजय मोरे, प्राचार्य कापसे, डॉ़ अशोक पोतदार, मंडळ अधिकारी टी़ जे़ यादव, व्यापारी असोशिएशन अध्यक्ष शरद भोसले, तलाठी व्यंकट पवार, प्रकाश पाटील, गणेश शिंदे, सहा़ कृषी अधिकारी कसबे, गणेश माने, ग्रामविकास अधिकारी आदमाने, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव पाटील, तलाठी विजय उस्तुरे, किशोर भोसले, हारुण अत्तार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते़

प्रारंभी लातूरच्या पोलिस पथकाने बिगुल वाजवून श्रध्दांजली वाहिली़ त्यानंतर आठ रायफलीच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़ या बिगुल पथकात पोहेकॉ़ माने यांच्यासह १० पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ भूकंपाची ही घटना वेदनादायी असल्याने गावात हा दिवस काळ दिन म्हणून पाळला जातो़.


वनविभागाकडून माहिती घेऊ
किल्लारीत चार एकरवर स्मृतीस्तंभ आहे़ या ठिकाणी उद्यान, कारंजे निर्माण करण्यात आले होते़ परंतु, आज या ठिकाणची देखभाल केली जात नसल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची शिफारस करणार आहे़ तसेच वनविभागाकडूनही माहिती घेणार असल्याचे तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले़

Web Title: Killari Mahapalikankar earthquake for 23 years ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.