शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

किडनीदात्याची माहिती आॅनलाइन

By admin | Updated: August 17, 2016 04:14 IST

मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला

मुंबई : मूत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत आणि पारदर्शक होण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठित करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार घेण्यात आला असून ही समिती यासंदर्भात १५ दिवसांत कार्यपद्धती तयार करेल. मूत्रपिंड दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करून आॅनलाइन माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज पत्रकारांना दिली.किडनी प्रत्यारोपण रॅकेटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील युरोलॉजीस्ट आणि नेफ्रॉलॉजीस्ट संघटनांच्या सदस्यांनी भेट घेऊन व्यथा मांडली होती. त्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक झाली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण अधिक सुलभ होण्यासाठी नियमावली करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे ठरले. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली, वैद्यकीय शिक्षण, विधी व न्याय, न्युरोलॉजीस्ट, नेफ्रॉलॉजीस्ट आदी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करून १५ दिवसांत नियमावली तयार करण्यात येणार आहे.मूत्रपिंडदात्याची ओळख पटविण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्यात येत असून त्या माध्यमातून दात्याची माहिती आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही प्रक्रिया आॅनलाइन करून त्याद्वारे मूत्रपिंडदात्याची माहिती, मूत्रपिंड स्वीकारणाऱ्या रुग्णाची माहिती, शस्त्रक्रिया झाल्याची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये संकलित होईल व ती माहिती आॅनलाइन करण्यात येईल. या प्रक्रियेच्या माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यारोपणामध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. रुग्णालयांकडून शस्त्रक्रियोत्तर माहिती घेऊन मूत्रपिंडदात्याची शस्त्रक्रियेनंतर तपासणी करून खात्री करण्यात येईल. (विशेष प्रतिनिधी)