शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत खेला होबे...? शरद पवारांना विजयाची खात्री, पण या गोष्टीची धाकधुकही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 10:48 IST

बारामतीत अजित पवारांनी अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. लोक लोकसभेला इकडे, विधानसभेला तिकडे असेही सांगत असल्याचे म्हटले होते.

राज्याचेच नाही तर संपूर्ण देशाचे लक्ष बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे लागले आहे. राष्ट्रवादी फुटल्याने व पवार कुटुंबातच परस्पर विरोधी उमेदवार देण्यात आल्याने या मतदारसंघात काय निकाल लागतो याची धाकधुक सर्वांनाचा लागलेली आहे. अजित पवार गटाने तर थेट मडके फोडण्यापर्यंतचा प्रचार केला आहे. तर मतदानापूर्वी मोठ्या प्रमाणावर पैसे वाटल्याचा आरोपही करण्यात येत आहे. अशातच शरद पवारांनीबारामतीबाबत विजयाची खात्री दर्शविताना साशंकता निर्माण करणारे वक्तव्यही केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

बारामतीत अजित पवारांनी अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. लोक लोकसभेला इकडे, विधानसभेला तिकडे असेही सांगत असल्याचे म्हटले होते. शरद पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील आपल्या कट्टर विरोधकांच्या भेटीगाठी सुरु केल्या होत्या. सख्खे-चुलत संपूर्ण पवार कुटुंब सुनेत्रा पवारांविरोधात प्रचाराला उतरले होते. एवढे करूनही सुप्रिया सुळे निवडून येणार की सुनेत्रा पवार याची शाश्वती कोणाला देता येत नाहीय. जो ज्याचा समर्थक तो त्याचाच उमेदवार जिंकणार असल्याचे दावे करत आहे. 

अशातच शरद पवार यांनी एका मुखतीतील प्रश्नावर ठोस दावा न करता साधक-बाधक उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही असे सांगतानाच इथे पैशांचा वापर कधीच झाला नव्हता, पण या निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला असे लोक सांगत आहेत. आता त्याचा परिणाम किती होईल याबाबत आज सांगता येणार नाही, असे वक्तव्य पवारांनी केले आहे. 

लोकसभा निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी भाजपला जागा कमी पडल्या तरी त्यांच्यासोबत युती करणार नाही असे पवारांनी स्पष्ट केले आहे. तसेच उद्धव ठाकरे देखील भाजपासोबत जाणार नाहीत म्हणजे नाहीत, असे पवारांनी छातीठोकपणे सांगितले आहे. पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली. यामध्ये पवारांनी या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. 

विधानसभेलाही महाविकास आघाडीने एकत्रच लढावे असे मला वाटत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. लोकसभेला 48 जागाच होत्या, माझा पक्ष जरी छोटा होता असला तरी जनमाणसांत रुजलेला पक्ष होता. तरीही आम्ही कमी जागा घेतल्या. जास्त जागा घेऊन त्या जिंकून आणण्याची कुवत आमच्यात होती. परंतु आपण तिघे एकत्र यायचे त्यामुळे सामंजस्य राखले जायला हवे होते, ते आम्ही पाळल्याचे पवारांनी स्पष्ट केले. तसेच विधानसभेला २८८ जागा आहेत, एकमेकांना समजून घेणे सोपे जाईल, असे सांगत यावेळी राष्ट्रवादी कमी जागा घेणार नाही, असा स्पष्ट इशारा शरद पवार यांनी उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला दिला आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbaramati-pcबारामतीAjit Pawarअजित पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४