मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 01:35 PM2020-01-24T13:35:41+5:302020-01-24T13:43:35+5:30

मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

Khedekar warns to Raj Thackeray on new flag of MNS | मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रेवरून पुरुषोत्तम खेडेकरांचा राज ठाकरेंना इशारा

googlenewsNext

मुंबई - छत्रपती शिवाजी महाजारांची राजमुद्रा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्यावर घेतल्यानंतरचा वादा वाढला आहे. मनसेच्या या कृतीचा विरोध राज ठाकरेंना रस्त्यावर दिसत नसला तरी अनेकांच्या मनात राग धुमसत आहे. त्यामुळे भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुरुवारी अधिवेशन पार पडले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरेंनी भगव्या रंगाचा झेंडा आणि त्या झेंड्यावर शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली आहे. त्यामुळे अनेक मराठा संघटनांकडून राजमुद्रा झेंड्यावर घेण्यास विरोध करण्यात आला आहे. तर अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या आहेत. यावर आता खेडेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

मराठा सेवा संघ आणि मराठा संघटनांच्या वतीने राज ठाकरेंच्या या कृतीला कायदेशीररित्या विरोध करण्याचे आम्ही ठरवलं आहे.  भविष्यात मनसे आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यास नवल वाटू नये, असा इशारा मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरुषोत्तम खेडकर यांनी दिला आहे. त्याचवेळी मनसे-संभाजी ब्रिगेड समोरासमोर आल्यास बहुजन मुलांचीच डोके फुटतील असे सांगत हे रोखण्यासाठी आणि मनसेला विरोध करण्यासाठी एक रणनिती आखली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वेळप्रसंगी मनसेविरुद्ध आंदोलनही उभारले जाईल, असंही खेडेकर यांनी स्पष्ट केले. 

सावरकरांच्या फोटोवरून प्रश्न उपस्थित

मनसेच्या कार्यक्रमात सावरकरांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. फोटो कोणते ठेवायचे हा प्रश्न त्या-त्या पक्षाचा आहे. सावकरांचे हिंदुत्व मनसेला मान्य आहे, असं वृत्त आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदू धर्माचे होते हे खरं असले तरी ते समतावादी, मानवतावादी आणि धर्मनिरपेक्ष होते. त्यांनी विषमता असलेल्या समाजात एकता निर्माण केली होती. याउलट राज ठाकरेंना कोणते सावरकर अपेक्षीत आहेत, असा प्रश्न खेडेकर यांनी उपस्थित केला.

1924 पूर्वीचे सावकर हे हिंदु-मुस्लीम एकतेचे पुरस्कर्ते होते. गायीचे पुजन करण्याची गरज नाही म्हणणारे होते. मात्र 1924 नंतर हिंदुत्व लिहून समाजा-समाजामध्ये वितुष्ठ निर्माण करणारे सावकर होते. मनसेला कोणते सावकर हवेत. त्याच सावकरांनी छत्रपती शिवाजी महाजारांना कातकालीय योगाने राजे झाले असं म्हटले आहे. याचा अर्थ कावळा उडायला आणि फांदी तुटायला अशा योगाने शिवाजी महाराज राजे झाले असं लिहून ठेवले आहे. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराच्या पत्नीला मानाने परत पाठवले, याला सावरकरांनी सज्जन विकृती म्हटले होते. असे सावरकर, राज ठाकरेंचे आदर्श असतील तर त्यांना शिवाजी महाराजांविषयी किती आदर आहे हे दिसून येते, अशी टीका खेडेकर यांनी केली.
 

Web Title: Khedekar warns to Raj Thackeray on new flag of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.