शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

घुमानवारीत साहित्यप्रेमींसाठी ‘खवय्येगिरी’

By admin | Updated: March 24, 2015 02:03 IST

८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे साहित्यप्रेमींसाठी घुमानवारीत ‘खवय्येगिरी’चा बेत आखण्यात आला आहे.

मुंबई : ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीतर्फे साहित्यप्रेमींसाठी घुमानवारीत ‘खवय्येगिरी’चा बेत आखण्यात आला आहे. येत्या १ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पुणे रेल्वे स्थानकावर येणाऱ्या संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेसमधे दोन दिवसांच्या प्रवासात खवय्यांसाठी अस्सल मराठमोळ्या पदार्थांची रेलचेल असेल, असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सांगितले.रेल्वे प्रवासातील सकाळचा न्याहारीपासून ते रात्रीचे जेवण यात केशर शिरा, मिसळ पाव यापासून ते केशरी जिलेबी, श्रीखंड, गुलाबजाम, पालकाची भजी, मूग भजी, अळूची पातळ भाजी, मसाला भात, भाजलेले पापड, पुरणाची आमटी आणि मसाले भात अशी अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थांची मेजवानी असणार आहे. तर न्याहारीसाठीही उपवासाची खिचडी, थालीपीठ-लोणी, साबुदाणा वडा असे पक्वान असणार आहेत. संमेलनातील साहित्य मेनूबरोबर हा खाद्यपदार्थांचा हा मेनूही साहित्यप्रेमींना आवडेल, असा विश्वास देसडला यांनी व्यक्त केला.खुद्द साहित्य संमेलनात सुद्धा रव्याचे लाडू, बालूशाही, खोबरा पाक, बेसनाचे लाडू, ड्रायफ्रूट स्वीट, सोनपापडी, सुजी हलवा, काजू कतली, दुधी हलवा, मोहनथाळ तसेच मधुमेही साहित्यप्रेमींसाठी शर्करामुक्त गोड पदार्थही ठेवण्यात आले आहेत, असेही देसडला यांनी स्पष्ट केले. बापट यांना मान!संतश्रेष्ठ नामदेव एक्स्प्रेस या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्याचा मान पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना देण्यात आला आहे. त्यानंतर ही गाडी पुणे, दौंड, अहमदनगर, मनमाड असा प्रवास करीत पंजाब (बियान)ला पोहोचेल, तेथून घुमानला सर्व व्यवस्था करण्यात आली आहे.