शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पीककर्जे आली संकटात!

By admin | Updated: June 14, 2015 02:54 IST

शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीककर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली असली

नवीन कर्जांबाबत नाबार्डनेही घेतला हात आखडता

मुंबई : शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पीककर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नव्याने कर्ज दिले जाईल, अशी घोषणा राज्य शासनाने केली असली तरी त्यासाठी आपला हिस्सा देण्यास शासनाने अद्याप कुठलीही तरतूद केलेली नाही. दुसरीकडे नवीन कर्जाबाबत नाबार्डने हात आखडता घेतला आहे. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मिळणारे पीककर्जच संकटात आले आहे. कर्जाचे पुनर्गठन करताना नाबार्डकडून ६० टक्के, राज्य शासनाकडून १५ टक्के आर्थिक भार उचलला जातो. राज्य बँक १० टक्के तर जिल्हा बँका १५ टक्के भार उचलतात. यातील शासनाचा १५ टक्के हिस्सा गेल्या १५ वर्षांपासून दिला जात नाही. त्यामुळे तो भार राज्य बँक आणि जिल्हा बँकांवर येतो. या पार्श्वभूमीवर नाबार्डकडून ६० टक्के आणि राज्य शासनाकडून १५ टक्के अशी ७५ टक्के रक्कम मिळाल्याशिवाय पुनर्गठन करण्याबाबत राज्य बँकेने असमर्थता दर्शविली. त्यामुळे पुनर्गठनाचा पेच वाढला. गेल्यावर्षीच्या कर्जाचे पुनर्गठन करताना राज्य शासन आपल्या हिश्शापोटीची सुमारे २ हजार कोटी रुपयांची रक्कम देणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. (विशेष प्रतिनिधी)रकमेची उभारणी चिंतेचा विषयनवीन पीककर्जाची रक्कम नाबार्डकडून ५० टक्के तर जिल्हा बँकांकडून ५० टक्के दिली जाते. नाबार्डकडे यंदा त्यापोटी ७ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात नाबार्डने अलीकडे ४ हजार ५०० कोटी रुपयेच मंजूर केल्याने नवीन कर्जासाठी रकमेची उभारणी कशी करायची, हा चिंतेचा विषय आहे. - कर्जाचे पुनर्गठन करताना शेतकऱ्यांवरील कर्ज कायम राहते, पण जिल्हा बँकांची आर्थिक स्थिती सुधारते. त्याऐवजी शेतकऱ्यांचा फायदा होईल, असा प्रस्ताव तयार करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकार आणि वित्त विभागाला सांगितल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांच्या व्यवस्थेलाच सुरुंग लावण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.पावसावर मदार..गेल्या दोन वर्षांमध्ये दुष्काळ आणि काही भागांत अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना संकटात आणले. आता मान्सून राज्यातील काही भागात बरसायला सुरुवात झाली आहे. पावसाने साथ दिली तर शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी होण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सारी मदार आता पावसावर आहे. कर्जाबाबत शासनाचा हिस्सा निश्चितपणे आणि तत्काळ दिला जाईल. तसेच नाबार्डने त्यांच्या हिश्शापोटी शासनाची हमी मागितलेली आहे. ती देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसमवेत सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. - चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री.