शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 09:13 IST

राहुल गांधींच्या भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघांसाठी सभा झाल्या होत्या.

- दीपक भातुसे  लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या बड्या नेत्यांनी महाराष्ट्रातील प्रचारावर लक्ष केंद्रित केले असताना शेवटच्या दोन टप्प्यांत महाराष्ट्रातील प्रचारासाठी काँग्रेसची भिस्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रियांका गांधी यांच्यावर राहणार आहे. अखेरच्या दोन टप्प्यांत राहुल गांधींची एकही सभा महाराष्ट्रात होणार नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने ‘लोकमत’ला दिली.  

राहुल गांधींच्या भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या चार मतदारसंघांसाठी सभा झाल्या होत्या. तर प्रियांका गांधींची लातूरला सभा झाली होती. उरलेल्या टप्प्यांसाठी प्रियांका गांधींची सभा १० मे रोजी नंदुरबारला आणि खरगेंची एक सभा १५ मे रोजी मुंबईत होत आहे. पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघांसाठी  मतदान होणार आहे. मात्र राहुल गांधींची एकही सभा मुंबईत होणार नाही. 

प्रतिष्ठेच्या लढाईवर लक्ष केंद्रीत गांधी घराण्याचे पारंपरिक मतदारसंघ असलेल्या रायबरेलीतून यावेळी राहुल गांधी निवडणूक रिंगणात उतरले आहेत, तर अमेठीतून किशोरी लाल शर्मा निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही जागा गांधी घराण्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील प्रचाराची धुरा प्रियांका गांधींनी हाती घेतली आहे. राहुल गांधी स्वतः रायबरेलीत लढत असल्याने अखेरच्या टप्प्यात त्यांना तिथे लक्ष केंद्रीत करावे लागेल. अमेठी आणि रायबरेलीसाठी पाचव्या टप्प्यात २० मेरोजी मतदान होत आहे.     

शेवटच्या दोन टप्प्यांत काँग्रेसचे सहा उमेदवार   nजागावाटपात काँग्रेसच्या वाट्याला १७ मतदारसंघ आले. nयातील पहिल्या तीन टप्प्यांत २४ पैकी ११ मतदारसंघ काँग्रेसकडे होते. nतर पुढील दोन टप्प्यांत मतदान होणाऱ्या २४ पैकी सहा मतदारसंघांत काँग्रेसचे उमेदवार आहेत. nयात नंदुरबार, धुळे, जालना, पुणे, मुंबई उत्तर-मध्य, मुंबई उत्तर यांचा समावेश आहे.

आतापर्यंत चार ठिकाणी घेतल्या सभा   nराहुल गांधी यांच्या राज्यात चार सभा झाल्या आहेत. यात भंडारा-गोंदिया, अमरावती, सोलापूर आणि पुणे या मतदारसंघांचा समावेश आहे. nपुण्यातील सभा पुणे, बारामती, शिरूर व मावळ या चार मतदारसंघांसाठी एकत्रित घेण्यात आली होती. nतर प्रियांका गांधींची लातूरमध्ये जाहीर सभा झाली होती. त्यानंतर आता नंदुरबार येथे प्रियांका गांधींची जाहीर सभा होणार आहे.    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४congressकाँग्रेस