शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर, जेजुरी गडावर यळकोट यळकोटचा घुमला जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 6:10 PM

कुलदैवत खंडोबादेव बहुजनांचे आराध्य दैवत असल्याने विविध परंपरा, रुढी विविध भागात जोपासल्या जातात...

ठळक मुद्देहजारो भाविकांनी घेतले दर्शन : पौष पौर्णिमा उत्साहात 

जेजुरी : अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीत सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोटच्या गजरात पौष पौर्णिमा झाली. राज्यभरातून आलेल्या हजारो भाविकांनी काल व आज देवदर्शन उरकले; तसेच पौष पौर्णिमेची वारी पूर्ण केली.कुलदैवत खंडोबादेव बहुजनांचे आराध्य दैवत असल्याने विविध परंपरा, रुढी विविध भागात जोपासल्या जातात. वर्षभरात जेजुरीत वेगवेगळ्या सात ते आठ यात्रा होत असतात. सोमवती अमावस्येव्यतिरिक्त प्रत्येक यात्रेत वेगळी परंपरा असते. अशीच ही पौष पौर्णिमा यात्रा होय. पौष पौर्णिमा यात्रा खऱ्या अर्थाने भटक्या-विमुक्त जाती जमातींची यात्रा मानली जाते. राज्यभरातून विविध ठिकाणांवरून वैदू, वडारी, कैकाडी, बेलदार (पाथरवट) कोल्हाटी आदी अठरापगड जाती जमातींचे समाजबांधव येथे आले होते. गडकोटात जाऊन भाविक दर्शनरांगेतून देवदर्शन घेत होते. देवदर्शन-कुलधर्म-कुलाचार आदी धार्मिक कार्यक्रम उरकून आपली वर्षाची वारी उरकत होते. पौष पौर्णिमेनिमित्त जेजुरीत भातू कोल्हाटी आणि वैदू समाजबांधवांची जातपंचायत भरत असे. मात्र या जातपंचायती वादग्रस्त ठरल्याने त्या बंद करण्यात आल्या आहेत. पंचायती भरल्या नसल्या तरीही या समाजाचे बांधव देवदर्शनासाठी जेजुरीत आलेले आहेत. यात्रेनिमित्त जेजुरीत गाढवांचा बाजारही यात्रेचे वेगळे वैशिष्ट्य मानले जाते.  ...दोन दिवसांच्या बाजारानंतर आलेल्या भाविकांनी गडावर जाऊन आराध्य दैवताचे दर्शन घेतले. वर्षातून एकदा वारी करणाऱ्या या भाविकांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक कार्यक्रमही उरकले. ठिकठिकाणी जागरण गोंधळ, तळीभंडार कार्यक्रम उरकले जात होते. मार्तंडदेव संस्थान, जेजुरी नगरपालिका यांनी भाविकांना सोयी-सुविधा पुरवल्या होत्या. जेजुरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्रा