शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचे अजूनही तळ्यात-मळ्यात! राजीनाम्याचा इन्कार; कार्यकर्त्यांनी काढला गुरुवारचा मुहूर्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 07:14 IST

भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र त्यांच्या पक्षांतराचा अर्थात सीमोल्लंघनाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. मात्र आता गुरुवारचा मुहूर्त निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.

जळगाव: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या वृत्ताने रविवारी चांगलीच खळबळ  उडाली. मात्र स्वत: खडसेंसह प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी त्याचा इन्कार केला आहे. तर दुसरीकडे येत्या गुरुवारी २२ रोजी  खडसे यांचा मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचा  मुहूर्त निश्चित झाला असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. 

 भाजपमध्ये नाराज असलेले खडसे राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहे. मात्र त्यांच्या पक्षांतराचा अर्थात सीमोल्लंघनाचा मुहूर्त लांबणीवर पडत आहे. मात्र आता गुरुवारचा मुहूर्त निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे.  खडसेंचे विश्वासू कार्यकर्ते मुंबईला जाण्याच्या तयारीला लागले आहेत. तसे संदेश त्यांना मिळाले असल्याचे समजते. 

खडसे यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. मात्र, स्वत: खडसे यांनी त्याचा इन्कार करत मीडियावालेच माझ्या पक्षांतराचा मुहूर्त ठरवत असल्याचे सांगितले. रावेर येथील चार अल्पवयीन मुलांच्या हत्येची  घटना शुक्रवारी घडली होती. या ठिकाणी कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी आलेले गृहमंत्री अनिल देशमुख व खडसे हे  एकाच वाहनातून पोहचले होते. दोघांमध्ये बंद द्वार चर्चाही झाली.  एकनाथ  खडसे यांच्या पक्ष सदस्यत्वाच्या राजीनाम्याविषयी मला माहिती नाही. त्यांचा राजीनामा माझ्याकडे आलेला नाही.    - चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाJalgaonजळगाव