शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्राची धाव, 81 डॉक्टरांची टीम रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 10:55 AM

Kerala Flood Relief : मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. 

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या केरळच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू आहे. मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55 तर पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टरांची टीम आज एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. केरळमध्ये मुसळधार पावसाने आणि पुराने येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. केरळमध्ये आतापर्यंत 357 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 21 हजार कोटींहून अधिक किमतीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी बचाव शिबिरात 20 लाख नागरिकांनी आश्रय घेतला असून पुराचे पाणी कमी झाल्यावर आता केरळमध्ये साथींच्या आजारांचा प्रसार होण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांतून डॉक्टर्सच्या टीम केरळला रवाना होत आहेत. सोमवारी सकाळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुंबईतील जेजे हॉस्पिटलचे 55  आणि पुण्यातील ससून हॉस्पिटलचे 26 डॉक्टर्स अशी एकूण 81 डॉक्टर्सची टीम एअर इंडियाच्या विमानाने केरळला रवाना झाली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातून रविवारी भारतीय वायुदलाच्या विमानाने राज्य शासनाकडून 30 टन साधनसामग्री पाठविण्यात आली आहे. पुन्हा आज पाच टन साहित्य रवाना करण्यात येणार आहे. तसेच, विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अन्न पाकिटे, दूध पावडर, ब्लँकेट्स, बेडशीट, कपडे, साबण, सॅनिटरी नॅपकिन्स आदी साहित्य पाठविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारकडून 20 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा आधीच केली आहे. याचबरोबर, केरळ पूरग्रस्तांच्या मदतकायार्साठी एक नियंत्रण कक्ष मंत्रालयात कार्यान्वित करण्यात आला आहे. राज्य सरकारसोबत एमसीएचआय-क्रेडाई, राजस्थानी वेल्फेअर असोसिएशन, जितो इंटरनॅशनल, रिलायन्स रिटेल यासारख्या विविध संस्था, संघटना या कामात करत आहेत. बृहन्मुंबई महापालिका, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, राजशिष्टाचार आदी विभागही या मदत कार्यात गुंतलेले आहेत. 

केरळ भवनात 200 टन साहित्यनवी मुंबईतल्या केरळ भवनमध्येही सुमारे 200 टन साहित्य जमा झाले आहे. त्यापैकी सुमारे दीडशे टन साहित्य नेव्ही व कोस्टगार्डच्या बोटीतून, तसेच रोरोमार्फत पाठविण्यात आले आहे. तसेच सौदी येथून केरळला निघालेल्या 20 व्यक्ती कोची विमानतळ बंद असल्याने शनिवारी मुंबई विमानतळावर उतरल्या होते. त्यांनी भवनमध्ये आश्रय घेतला आहे.

टॅग्स :Kerala Floodsकेरळ पूरdoctorडॉक्टरMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र