‘तर केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी उपोषण’

By admin | Published: May 10, 2017 02:27 AM2017-05-10T02:27:37+5:302017-05-10T02:27:37+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी घेतल्याचे पुरावे मिळाल्यास आपण स्वत: त्यांच्या राजीनाम्यासाठी

'Kejriwal's fast to resign' | ‘तर केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी उपोषण’

‘तर केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी उपोषण’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पारनेर (जि. अहमदनगर) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी घेतल्याचे पुरावे मिळाल्यास आपण स्वत: त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलन व उपोषण करू, अशी घोषणा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.
अण्णांच्या या पवित्र्याने केजरीवाल आणखी अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांनी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी केला होता.

Web Title: 'Kejriwal's fast to resign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.