CoronaVirus मुंबईत लोकल सेवा बंदच ठेवा; उद्धव ठाकरेंच्या मागणीला आठवलेंचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:31 PM2020-05-12T19:31:03+5:302020-05-12T19:31:47+5:30

मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. झोपडपट्ट्यांसह अन् ठिकाणी कोरोना पोहोचलेला आहे. रेड झोन असून देशातील लॉकडाऊन तीनवेळा वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता.

Keep local services closed in Mumbai; Ramdas athavle oppose Uddhav Thackeray hrb | CoronaVirus मुंबईत लोकल सेवा बंदच ठेवा; उद्धव ठाकरेंच्या मागणीला आठवलेंचा विरोध

CoronaVirus मुंबईत लोकल सेवा बंदच ठेवा; उद्धव ठाकरेंच्या मागणीला आठवलेंचा विरोध

Next

मुंबई : मुंबईमध्ये अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या प्रवासासाठी लोकलसेवा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. मात्र, यास रिपाईचे खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. 


मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. झोपडपट्ट्यांसह अन् ठिकाणी कोरोना पोहोचलेला आहे. रेड झोन असून देशातील लॉकडाऊन तीनवेळा वाढविण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला होता. ज्या ठिकाणी रेड झोन आहे तेथील लॉकडाऊन वाढविण्याची गरज आहे. १७ मे नंतरचा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढवावा अशी माझी सूचना असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 


तसेच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे लोकल सेवा सुरु करण्याची मागणी केली आहे. ती चुकीची असून जर लोकल सेवा सुरु केली तर कोरोना वाढण्याची शक्यता आहे. यामुळे लोकल सेवा बंदच ठेवावी अशी माझी मागणी आहे. कारण गर्दी वाढली तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने होईल. यामुळे लोकलसेवा काही काळ बंद राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे आठवले यांनी सांगितले. 

महत्वाच्या बातम्या...

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये भाजपा आमदार पुत्राची महामार्गावर घोडेस्वारी

CoronaVirus तळीरामांचे फावले! ऑर्डर दिल्यावर राज्यात दारु घरपोच मिळणार

चीनने युआनचे अवमुल्यन केले तर? अभिजीत बॅनर्जींनी सांगितले अर्थकारण

CoronaVirus अमेरिकेतील भारतीय मोठ्या संकटात; नोकरी गेली, एअर इंडियानेही नाकारले

Web Title: Keep local services closed in Mumbai; Ramdas athavle oppose Uddhav Thackeray hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.