शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 18:54 IST

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मोदी-शाहांवर शाब्दिक वार

Jayant Patil on Karnataka Elections: बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मिळालेल्या दारुण पराभवावर ट्वीट करत जोरदार टीका केली. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले, असेही जयंत पाटील म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्वीकारावा लागला. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेत भाजपाच्या खात्यात केवळ ६४ जागा गेल्या. तर काँग्रेसने तब्बल १३६ जागांवर कब्जा केला. या पराभवाबरोबरच भाजपाच्या दक्षिण भारतातील अभियनाला मोठा धक्का बसला आहे.

याबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, "बजरंगबलीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या लोकांवर बजरंगबलीनेच गदा फिरवली. कर्नाटक हे देशातील एक अत्यंत प्रगतिशील राज्य आहे. या राज्यातील जनतेने आज सत्ताधारी भाजपच्या विरोधात कौल देऊन बहुमताने काँग्रेसला सत्तेत आणले. जनतेला भ्रष्टाचार आणि जातीधर्मांत तेढ निर्माण करणारे मुद्दे नको आहेत हे सिद्ध झाले. संपूर्ण देश पादाक्रांत करण्याची भाषा करणारे लोक आज संपूर्ण दक्षिण भारतातून हद्दपार झाले आहेत असा जोरदार टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे," असे ट्विट त्यांनी केले. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने  कर्नाटक प्रदेश काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे जयंत पाटील यांनी अभिनंदन केले.

ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले. "बजरंग बलीनेही कर्नाटकातील मोदीजींच्या प्रचाराला ठेंगा दाखवला. मीडिया जेपी नड्डाजी किंवा सीएम बोम्मईजी यांचा चेहरा पराभूत म्हणून दाखवू शकतो पण पंतप्रधान मोदींचे अपयश आहे कारण त्यांनी संपूर्ण प्रचार स्वतःबद्दल केला आहे" असं प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले.

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाcongressकाँग्रेस