शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत चीनचे एजंट!, महाराष्ट्रातील नेत्यांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची आगपाखड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 19:26 IST

महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ

प्रकाश बेळगोजी बेळगाव : महाराष्ट्र - कर्नाटक सीमाप्रश्नावरून राजकीय वातावरण तापले असून दोन्ही राज्यातील नेतेमंडळीकडून एकमेकांवर वार-पलटवार सुरु आहेत. सर्वोच्च न्यायालयातील अंतिम टप्प्यात असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील नेत्यांमध्ये सुरु झालेली हमरी - तुमरीवर जाऊन पोहोचली आहे. बेळगावमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांचा निषेध करणारा ठराव मांडला.शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कर्नाटकाला चेतावणी देत आपल्याला प्रवेश करू नाही दिला तर आपण चीनप्रमाणे कर्नाटकात प्रवेश करू असे विधान केले. यावर प्रत्त्युत्तर देताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी राऊत हे देशद्रोही आणि चीनचे एजंट असल्याचा आरोप केला. संजय राऊत आणि महाराष्ट्रातील नेते ज्याप्रमाणे वक्तव्य करत आहेत यामुळे देशाची एकता भंग होत असून जर महाराष्ट्रातील नेते अशापद्धतीने प्रक्षोभक विधान करून कायदा-सुव्यवस्था आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांची अडवणूक कशी करायची आणि कशापद्धतीने कायदेशीर कारवाई करायची हे आपल्याला चांगलेच ठाऊक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ..यावरूनच महाराष्ट्रातील नेत्यांची वैचारिक क्षमता लक्षात येत महाराष्ट्रात सुरु असलेल्या अधिवेशनात 'कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना मस्ती आल्याचे' विधान करण्यात आले.  महाराष्ट्रातील नेतेमंडळी टीका-टिप्पणी करण्याचा दर्जा विसरले असून एका राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी बोलताना त्यांना भाषेचे भान राहिले नसून यावरूनच महाराष्ट्रातील नेत्यांची वैचारिक क्षमता लक्षात येत असल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. शिवाय महाराष्ट्रातील प्रशासनाला तेथील जनता वैतागली असून तेथील राजकारण्यांनी महाराष्ट्रातील परिस्थितीकडे लक्ष द्यावे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. ज्याप्रमाणे येथील कार्यक्रमांना महाराष्ट्रातील नेत्यांना आमंत्रण मिळते त्याचप्रमाणे आपल्या राज्यातील मंत्र्यांनाही सोलापूर, अक्कलकोट येथून आमंत्रणे येतात. मात्र येथील नेतेमंडळींना वेळ नसल्याने ते त्याठिकाणी पोहोचू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी आणि वारा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाहीयावेळी जयंत पाटील यांच्यावरदेखील मुख्यमंत्र्यांनी तोफ डागत कृष्णेचे पाणी देणे किंवा न देणे हे महाराष्ट्राच्या हातात नसून ती देशाची आणि नैसर्गिक संप्पती असून पाणी आणि वारा मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नसल्याचे सांगितले. पुराणकाळापासून पाणी आणि वारा रोखणे कुणालाही शक्य झाले नसून देशातील नैसर्गिक संपत्ती हि राज्यापुरती मर्यादित नसल्याचे सांगितले. एकेकाळी जयंत पाटील यांच्याशी आपण जलविवादावर चर्चा केली. परंतु आता त्यांची भाषा बदलल्याचे सांगत कर्नाटकात सर्वाधिक लांब कृष्णा नदी वाहत असून कृष्णेचे पाणी रोखणे अशक्य असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊमहाराष्ट्रातील नेत्यांना आपल्या भाषेत, आपल्या शैलीत आपल्याला उत्तर देता येणे सोपे आहे. परंतु हि आपली संस्कृती नाही. कर्नाटकातील लोक संस्कृती जपणारे आणि कायद्याचे पालन करणारे आहेत, मात्र मर्यादेपलीकडे आपण सहन करणार नाही आणि शांतही बसणार नाही, आपल्याला संविधान, हक्क आणि कायदा याबाबत संपूर्ण माहिती असून महाराष्ट्राला योग्यवेळी योग्य उत्तर देऊ, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटकSanjay Rautसंजय राऊतJayant Patilजयंत पाटील