कारागिराने सराफाचे अडीच किलो दागिने लांबविले

By Admin | Updated: June 10, 2014 23:13 IST2014-06-10T22:41:00+5:302014-06-10T23:13:34+5:30

सराफाकडे काम करणार्‍या कारागिराने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सराफाकडून अडीच किलो सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे.

Karagiri laced up to 2.5 kg of jewelery | कारागिराने सराफाचे अडीच किलो दागिने लांबविले

कारागिराने सराफाचे अडीच किलो दागिने लांबविले

पुणे : नारायण पेठेतील एका सराफाकडे काम करणार्‍या कारागिराने जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सराफाकडून अडीच किलो सोन्याचे दागिने घेऊन पळ काढला आहे. २०१० ते फेब्रुवारी २०१३ या कालावधी हा प्रकार घडला आहे.
प्रकाश नामदेवराव लिगाडे (वय ३८, रा. साळंुके विहार, वडगांव-बुद्रुक, सिंहगड रोड) दागिने लांबविणार्‍या कारागिराचे नाव आहे. याप्रकरणी सराफ व्यावसायिक विवेक वसंतराव भिलारे (वय ३२, रा. नारायण पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. लिगाडे हा भिलारे यांच्या दुकानात कारागिर म्हणून कामाला होता. त्याने भिलारे यांना जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ६२ लाख रूपयांचे २ किलो २६५ ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेतले. तसेच रोख रक्कम १४ लाख अशी एकूणा ७७ लाख २५ हजार रूपये घेऊन फसवणूक केली आहे.
दागिन्यांच्या मोबदल्यात त्याने पैसे परत करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे लक्षात आल्यानंतर भिलारे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक पाटील याप्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Karagiri laced up to 2.5 kg of jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.