कल्याणमध्ये पत्नीनेच केली पतीची हत्या, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:49 IST2017-09-18T14:49:06+5:302017-09-18T14:49:51+5:30
घरगूती भांडणाच्या कारणावरुन पत्नीने पतीवर चाकूचा हल्ला केला. या हल्ल्यात पती जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला.
_201707279.jpg)
कल्याणमध्ये पत्नीनेच केली पतीची हत्या, पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
कल्याण, दि. 18 - घरगूती भांडणाच्या कारणावरुन पत्नीने पतीवर चाकूचा हल्ला केला. या हल्ल्यात पती जखमी झाला. त्याला उपचारासाठी कळवा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार घेत असताना त्याचा मृत्यू झाला. मृत पतीचे नाव रवी अशोख वाघमारे (25) आहे. ही घटना आंबिवली स्टेशननजीकच्या वस्तीत घडली. पतीची हत्या केल्या प्रकरणी पत्नी स्वरुपा वाघमारे हिला खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे.
स्वरुपा हिचे रविसोबत नऊ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. स्वरुपा ही रेल्वे गाडीत फेरीचा व्यवसाय करीत होती. तिच्या पतीसोबत तिचे भांडण व्हायचे. काल रात्रीही तिच्या पतीसोबत तिचे कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचा राग मनात धरुन स्वरुपाने रवीच्या छातीत चाकूने प्रहार केला. हा प्रहार इतक्या जोराने होता की, चाकू थेट त्याच्या ह्रदयाला रक्तपुरवठा करणा:या वाहिनीला लागला. रवी जागीच खाली कोसळला.
रवीला उपचारासाठी कळवा येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ह्रदयाला रक्त पुरवठा करणा:या वाहिनीला जबर दुखापत झाल्याने रवीचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. पोलिसांनी पतीच्या हत्ये प्रकरणी स्वरुपाला अटक केली आहे. केवळ घरगूतीच भांडण हे कारण नसून स्वरूपाच्या चारित्र्यावर रवी संशय़ घेत असल्याने त्यांची भांडणो होत असल्याने स्वरूपाने रागाच्या भरात त्याची हत्या केली असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून सांगण्यात आली. या प्रकरणी स्वरुपाच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.