शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 23:59 IST

Kalyan Crime News: कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला बेदम मारहाण करून पळून गेलेला परप्रांतीय तरुण अखेर सापडला आहे. गोकुल झा असं या तरुणाचं नाव असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढून बेदम चोप दिला.

कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या एका मराठी तरुणीला बेदम मारहाण करून पळून गेलेला परप्रांतीय तरुण अखेर सापडला आहे. गोकुल झा असं या तरुणाचं नाव असून, मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी गोकुल झा याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. आता या प्रकरणाती पुढील तपास सुरू आहे.

कल्याणमधील एका खाजगी रुग्णालयामध्ये रिसेप्शनिस्ट तरुणीला एका परप्रांतीय तरुणाने किरकोळ वादानंतर मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली  होती. तसेच हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाला होता. मात्र मारहाणीच्या घटनेनंतर आरोपी गोपाल झा हा फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. तसेच मनसेच्या कार्यकर्त्यांनीही त्याला पकडण्यासाठी इशारा दिला होता. दरम्यान, हा गोकुल झा लपून बसलेल्या ठिकाणाचा ठावठिकाणा लागल्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून काढत बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आता या गोकुल झा याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून, बुधवारी त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान, या प्रकरणातील पीडित तरुणीने तिच्यासोबत झालेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती देताना सांगितले होते की, "मी बाल चिकित्सालय क्लिनिक मध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. हा इसम अनन्या झा नावाच्या रुग्णाबरोबर आला होता. मी पहिल्यांदाच त्याला इथे पाहिले. तो आतमध्ये जाण्यासाठी खूप घाई करत होता. मी त्याला एवढंच बोलले की, तुमचा सध्या नंबर नाहीये, तुम्ही १० मिनिटे वाट बघा. तर त्याने मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने शिवीगाळ केल्यानंतर मी ही व्यक्ती माझ्याशी योग्य पद्धतीने बोलत नाही आहे, असे आमच्या सरांना सांगितले.. मी त्याला असेही सांगितले की तू माझ्याशी नीट बोल. तर तो माणूस माझ्या अंगावर मारण्यासाठी धावला आणि त्यानंतर माझे केस पकडून दरवाजापर्यंत मला खेचत खेचत नेले. मला त्यांनी एवढे मारलं की माझा श्वासही थोड्या क्षणांसाठी थांबला होता, असे पीडित तरुणीने सांगितले. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात गोकुल झा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारीMNSमनसेPoliceपोलिस