शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

कालिदास स्मारक अंधारात

By admin | Updated: June 29, 2014 00:46 IST

‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कालिदास स्मृतिदिन : पालिका प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींची अनास्था उघड रामटेक : ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गडावरील कालिीदास स्मारकावर साधी विद्युत रोशनाई करण्यात आली नव्हती. पालिका प्रशासनातर्फे कुठलाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. यानिमित्ताने महाकवी कालिदासांप्रति प्रशासन व लोकप्रतिनिधींची अनास्था उघड झाली. महाकवी कालिदासांना रामटेकच्या रामगिरीवर आषाढ मेघ पाहून ‘मेघदूत’ हे महाकाव्य स्फुरले. कालिदासांच्या वास्तव्याने रामटेकला अजरामर असा साहित्यिक वारसा लाभला. याचे गोडवे गाऊन राजकीय भांडवल करण्यास राजकीय मंडळी मागे पाहात नाही. प्रत्यक्षात कालिदासांविषयी काही करायची वेळ येते, तेव्हा कुणीही काहीही करायला तयार नसतात याची प्रचिती आली.कालिदास स्मारक हेदेखील रामटेकचे वैभव आहे. या परिसरात साकारलेली ओमची भव्य वास्तूदेखील देखणी आहे. स्थानिक पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे या वास्तूची दैनावस्था झाली आहे. संगीत कारंजे पाण्याअभावी बंद आहेत. लॉन सुकले आहेत. वास्तूचे सौंदर्य लयाला गेले. कालिदासांच्या स्मृितदिनी प्रशासनाने या स्मारकावर रोशनाई करायला हवी होती, मात्र येथे साधा दिवाही लावण्यात आला नाही. महाकवींच्या नावाने राज्य शासनाने कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची निर्मिती केली. या विद्यापीठात कालिदास स्मृतिदिनाचा कार्यक्रम हा शनिवारऐवजी शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त संशोधन सभेचे आयोजन करण्यात आले होते, असे सांगण्यात आले. शनिवारी या विद्यापीठाचा संपूर्ण परिसर निर्मनुष्य होता. शनिवारी सुटी असल्याने एक दिवस आधीच कार्यक्रम घेण्यात आल्याचे संबंधितांनी सांगितले. सुटीच्या दिवशी कार्यक्रमाला कर्मचारी उपस्थित राहण्यास कुरकुर करतात, असेही स्पष्ट केले.तालुका पत्रकार संघाच्यावतीने कालिदास स्मारक परिसरात काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. यात मिनाज पौचातोड, पवन कामङ्मी, प्रा. जगदीश गुजरकर, वसंत डामरे, अनुराग गिरधर आदींनी काविता सादर केल्या. दीपक गिरणर यांनी कालीदासांच्या काव्यप्रतिभा उपस्थितांसमोर मांडली. यावेळी त्रिलोक मेहर, नत्थू घरजजाळे, संजय मुलमुले, प्रवीण टाकळे, अनिल वाघमारे उपस्थित होते. सीएसी आॅल राऊंडरचे अमोल खंते यांनी कपूरबावडी ते गडमंदिरदरम्यान ट्रेकिंगचे आयोजन केले होते. मात्र, या कार्यक्रमालाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. (तालुका प्रतिनिधी)