शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अंनिस हेल्पलाइनकडे जातपंचायतींच्या तक्रारी

By admin | Updated: March 14, 2015 05:07 IST

अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्यासह अशा प्रकरणांमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या

औरंगाबाद : अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या कायद्यासह अशा प्रकरणांमधील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सुरू केलेल्या हेल्पलाइनकडे पाच महिन्यांत २०० हून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील १५० तक्रारी या जातपंचायतीने केलेल्या अमानुष छळासंदर्भात असल्याचे हेल्पलाइन समन्वयक भगवान रणदिवे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. अनिष्ट-प्रथा रुढींचे निर्मूलन करत विवेकी-विज्ञाननिष्ठ समाज घडवण्यासाठी २० डिसेंबर २०१३ रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यांतर्गत १२० हून अधिक गुन्हे राज्यभरात दाखल झाले. मात्र नागरिकांना अत्याचार वा फसवणुकीबाबत थेट तक्रार करता यावी, यासाठी सप्टेंबरमध्ये अंनिसने ७५८८८०६६८८ क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली. समितीच्या ह्यजातपंचायत मूठमातीह्ण अभियानाचे कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की जातपंचायतीचा प्रश्न केवळ भटक्या-विमुक्तांचाच आहे असा अनेकांचा समज होता.मात्र आता जैन, मुस्लिम समाजातील व्यक्तींकडूनही या तक्रारी येतात. आपली न्यायालयीन प्रक्रिया कीचकट व वेळखाऊ असल्याने लोकांना जातपंचायतीचा पर्याय अधिक सोपा वाटतो व पुढे ते त्यात गुरफटत जातात, असेही ते म्हणाले