शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

न्या़ थूल यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबीयांची भेट

By admin | Updated: October 7, 2015 01:06 IST

औसा तालुक्यातील गोंद्री येथील एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली़ या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती

लातूर : औसा तालुक्यातील गोंद्री येथील एका दलित अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केल्याची घटना नुकतीच घडली़ या प्रकरणाची दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाने घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सी़ एल़ थूल यांनी मंगळवारी गोंद्री येथे पीडितेच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले़ समाजकल्याण विभागाच्या वतीने ‘त्या’ कुटुंबाला १ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा धनादेशही थूल यांच्या हस्ते देण्यात आला़ गोंद्री येथील दलित कुटुंबातील शुंभागी बळीराम अजुने या अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा बलात्कार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेने लातूर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात खळबळ उडाली. शनिवारी तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर आलेल्या प्राथमिक अहवालावरून औसा पोलीस ठाण्यात शनिवारी सात नराधमांविरोधात बलात्कार, खून आणि अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी सातपैकी सहा नराधमांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस संरक्षणाच्या सूचनागोंद्री येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणानंतर आता आरोपींकडून अर्जुने कुटुंबीयांवर दबाव आणला जात आहे. त्यांना पोलीस संरक्षण देण्याच्या सूचना न्यायमूर्ती थूल यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत.सीआयडी चौकशीची मागणीघटनेच्या प्रारंभीपासूनच या प्रकरणात औसा पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे या घटनेचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी अर्जुने कुटुंबीयाने आयोगाकडे केली.