मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांचे ऐतिहासिक छायाचित्र; नागपूरचे भाजपा आमदार गैरहजर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 11:41 IST2019-12-20T11:19:00+5:302019-12-20T11:41:44+5:30

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आमदारांचं छायाचित्र घेण्यात आलं आहे.

Joint photo of MLAs in presence of CM; Nagpur BJP MLA absent | मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांचे ऐतिहासिक छायाचित्र; नागपूरचे भाजपा आमदार गैरहजर 

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आमदारांचे ऐतिहासिक छायाचित्र; नागपूरचे भाजपा आमदार गैरहजर 

नागपूरः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज सकाळी नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाऊन वंदन केले, यावेळी त्यांचे स्वागत तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांनी जय महाराष्ट्र या घोषणांनी केले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनेक आमदारांनीही दीक्षाभूमीला भेट दिली. सकाळी दहाच्या सुमारास नागपूर येथील विधान भवनाच्या पायर्‍यांवर या चौदाव्या विधानसभेच्या सदस्यांनी एक संयुक्तरीत्या ऐतिहासिक छायाचित्र काढले. यात मुख्यमंत्र्यांसह अनेक आमदार व सदस्य उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज आमदारांचं संयुक्त छायाचित्र घेण्यात आलं आहे.

मात्र यावेळी नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांसह अन्य आमदार भाजप आमदार गैरहजर असल्याचे आढळून आले. तसेच महिला आमदारांसाठी समोरच्या रांगेत जागा मिळावी, अशी महिला आमदारांनी केलेली विनंती अन्य आमदारांनी दुर्लक्षित केली. त्यामुळे महिला आमदारांना मागच्या रांगेत उभे राहून छायाचित्र काढून द्यावे लागले. महाराष्ट्रात शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाराष्ट्र विकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे. 

Web Title: Joint photo of MLAs in presence of CM; Nagpur BJP MLA absent